आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • Buldhana
  • The Attention Of Congressmen In The District Towards The Post Of Congress District President; The Hope Was To Get A Legislative Council After Wasnik Went To The Rajya Sabha |marathi News

सर्वांचे लक्ष:काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाकडे जिल्ह्यातील काँग्रेसजनांचे लक्ष; वासनिक राज्यसभेवर गेल्यानंतर विधान परिषद मिळण्याची होती आशा

बुलडाणा17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक व्यक्ती एक पद असे चिंतन बैठकीत ठरल्यानंतर शिर्डीच्या बैठकीत राहुल बोंद्रे यांनी आपल्या पदाचा तत्काळ राजीनामा देऊन पक्ष धर्माचे पालन केले. त्यानंतर आता जिल्हाध्यक्ष कोण होणार यावर काँग्रेसजनांमध्ये चर्चा सुरु आहे. त्यातच मुकुल वासनिक राज्यसभेवर निवडून गेल्याने जिल्हाध्यक्षपदाची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. आता विधान परिषदेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे बुलडाण्याला त्यात स्थान मिळेल, अशी आशा होती पण ती फोल ठरली. त्यामुळे आता फक्त जिल्हाध्यक्ष पदाकडेच सर्वांचे लक्ष लागून आहे.

काँग्रेस हा राष्ट्रीय स्तरावरील पक्ष व एका विचारधारेवर चालणारा पक्ष असल्याने त्यात अनेक गट तट पूर्वीपासूनच आहेत. सध्याही गट-तटाचे राजकारण आहेच. कोणी वासनिक यांचे जवळचे तर कोणी वासनिकांनाच दूर ठेवण्याची तयारी ठेवली होती. शेवटी राजकारणाचा डाव प्रत्येक नेता आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी व्यूहरचना करतच असतो. त्यात जो यशस्वी ठरला तोच सिकंदर म्हणावे लागते. जिल्हाध्यक्ष पदाचा बदल होणार अशी चर्चा असतानाच ऐनवेळी राहुल बोंद्रे यांनी ते पद स्वतःकडेच ठेवण्यात बाजी मारली. अन् तो विषय काही वर्षांकरिता तरी संपला असे वाटत होते. अखेर चिंतन बैठकीतील चिंतनाने या पदाबाबत पुन्हा एकदा उत्सुकता निर्माण झाली आहे. मुकुल वासनिकांवर हार, पुष्प गुच्छ घेऊन, मोबाइलवर बोलून शुभेच्छांचा वर्षाव सध्या सुरू आहे. प्रश्न एवढ्यातच मार्गी लागण्याची शक्यता कमी आहे. परंतु, आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिका निवडणुका बघता जिल्हाध्यक्षपदी निवड लवकर करणेही आवश्यक आहे. त्यानुसार आता अध्यक्षपदाचे दावेदार कोण, हा प्रश्न चर्चेला आला आहे.

हे असू शकतात दावेदार
राहुल बोंद्रे यांचा कार्यकाळ संपताना जी नावे चर्चेत होती. तीच आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. फक्त अपवादात्मक एखादे नवे नाव पुढे येण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे एकनिष्ठ व बऱ्याच वर्षांपासून कोठलेही पद न मिळालेले ॲड. विजय सावळे यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. राजस्थानमध्ये वासनिकांनी त्यांचे गायलेले गोडवे त्यांचे खरेच तोंड गोड करणारे ठरेल काय, याची उत्सुकता आहे. महिलांमधून जि.प. सदस्या जयश्री शेळके यांचेही नाव पुढे येऊ शकते. त्या सक्रिय कार्यकर्त्या आहेत. खामगाव विधानसभा निवडणूक हरलेले ज्ञानेश्वर पाटील हे सुद्धा नव्याने पुढे येऊ लागले आहेत. जि. प. चे माजी अध्यक्ष प्रकाश पाटील, दीपक रिंढे, संतोष आंबेकर, हाजी दादूसेठ, कासम गवळी ही नावे सुद्धा चर्चेत आहेत. पण, काँग्रेसमध्ये कधी काय निर्णय होईल हे सांगता येत नाही. अनपेक्षित धक्काही बसू शकतो.

बातम्या आणखी आहेत...