आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:घरात जन्मले होते इवलेसे बाळ, पण कोरोना योद्धा डॉक्टरला करावा लागत होता रुग्णाचा सांभाळ

बुलडाणाएका वर्षापूर्वीलेखक: प्रवीण पवार
  • कॉपी लिंक
  • तान्हुल्याला पाहण्यासाठी दीड महिन्याची प्रतीक्षा, डॉ. वासेकर राहिले हॉटेलात

लक्ष्मीकांत बगाडे

कोविड रुग्णांवर उपचार करत असतानाच सामान्य रुग्णालयातील डॉक्टर सचिन वासेकर यांना मुलगा झाला. परंतु, कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांचा सांभाळ करताना त्यांना आपल्या चिमुकल्याचे मुखदर्शनही घेता आले नाही. आता थोडी उसंत मिळाली तेव्हा तब्बल दीड महिन्याने त्यांनी आपल्या छकुल्याला जवळ घेतले. या दीड महिन्यात त्यांनी आपल्या सहकारी डॉक्टरांसोबतच एका हॉटेलमध्ये दिवस काढले. दरम्यान, व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून मुलाला पाहण्याचा योग आला. मात्र, त्याला जवळ घेण्याचा योग दीड महिन्याने आला.डॉ. सचिन पांडुरंग वासेकर हे यवतमाळ जिल्ह्यातील झाडगाव येथील रहिवासी आहेत. 

वडील शिक्षक असल्याने सेवाधर्मही त्यांच्या मनातच रुजलेला आहे. दहा वर्षंापासून येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात ते डॉक्टर म्हणून सेवा देत आहेत. सागवन येथे पत्नी स्वाती यांच्यासोबत ते राहत आहेत. दरम्यान, कोरोना महामारीने सर्वत्र हाहाकार माजवला आणि बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातही कोरोना रुग्ण दाखल होऊ लागले. एका रुग्णाचा मृत्यू झाला. कोरोनाशी लढाईत डॉ. वासेकरांनी इतर डॉक्टरांसोबत झोकून दिले. दरम्यान, २४ मार्च २०२० रोजी डॉ. वासेकर यांच्या घरात चिमुकल्या बाळाचे आगमन झाले. डॉ. अर्चना वानेरे यांच्या देखरेखीत सौ. स्वाती यांनी गोंडस बाळाला जन्म दिल्याची माहिती त्यांना मिळाली. मेसेज मिळाल्यानंतर दुरूनच मुलाची भेट घेतली, पण पॉझिटिव्ह रुग्णांची सेवा करत असल्याने जोपर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आटोक्यात येत नाही तोपर्यंत घरी न जाण्याचा निर्णय डॉ. वासेकर यांना घ्यावा लागला. दोन दिवसांपूर्वीच डॉ.वासेकर यांना उसंत मिळाली. त्यामुळे ते घरी जाऊ शकले, मुलाचा चेहरा प्रत्यक्ष पाहू शकले.

बातम्या आणखी आहेत...