आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृतदेह:घरून निघून गेलेल्या वीस वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला

खामगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

घरून निघून गेलेल्या लाखनवाडा येथील वीस वर्षीय तरुणाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत आवार येथील गवई यांच्या शेतात मृतदेह आढळून आला. त्याने आत्महत्या का केली यांचे कारण समजू शकले नाही.

तालुक्यातील लाखनवाडा येथील प्रवीण कैलास वानखडे २८ डिसेंबर रोजी घरातून निघून गेला होता. कुटुंबियांनी त्याचा शोध घेतला परंतु तो मिळून आला नाही. त्यामुळे त्याच्या आईने हिवरखेड पोलिस ठाण्यात ३० डिसेंबर रोजी तक्रार दिली. पोलिसांनी हरवल्याची नोंद केली होती. हिवरखेड पोलिस ठाण्याचे चव्हाण हे त्याचा शोध घेत होते.

सोमवारी सकाळी प्रवीण वानखडे शेतातील खैऱ्याच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. या घटनेची माहिती आवार गावात समजताच घटनास्थळावर लोकांची गर्दी जमली होती. आवारचे पोलिस पाटील संदीप खराबे यांनी खामगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रवीणचे शव ताब्यात घेत शवविच्छेदनाकरीता सामान्य रुग्णालयात पाठवले.

बातम्या आणखी आहेत...