आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तक्रार:गुरे चारण्यासाठी गेलेल्या‎ शेतकऱ्याचा मृतदेह आढळला‎

देऊळगाव राजा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरे चारण्यासाठी‎ गेलेल्या तालुक्यातील जांभोरा‎ येथील एका शेतकऱ्याचा गिरोली‎ खुर्द शिवारात मृतदेह आढळून‎ आला. ही घटना मंगळवारी, दि. ३१‎ जानेवारी रोजी उघडकीस आली.‎ जांभोरा येथील गजानन आश्रूजी मुंडे‎ यांनी या प्रकरणी देऊळगावराजा‎ पोलिस ठाण्यात तक्रार दिली.‎

त्यामध्ये नमूद केले की, जांभोरा‎ येथील कुंडलिक नंदाजी मुंडे (वय‎ ६५) सोमवारी, दि. ३० जानेवारी‎ रोजी त्यांची गुरे गावालगत‎ असलेल्या गिरोली खुर्द शिवारात‎ चारण्यासाठी घेऊन गेले होते.‎ सायंकाळी गुरे घरी आली. मात्र, ते‎ परतले नाहीत. त्यामुळे नातेवाइक‎ आणि गावातील नागरिकांनी त्यांचा‎ शोध घेतला.‎

बातम्या आणखी आहेत...