आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलगा बेपत्ता:मोबाइल पाहण्यास हटकल्याने घर सोडलेला मुलगा रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुखरूप

शेगाव14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोबाइल पाहू नको, असे वडिलांनी हटकल्याने राग आलेल्या मुलाने घर सोडून तो निघून गेल्याची घटना काही दिवसांपूर्वी जळगाव खान्देश येथे घडली. त्यामुळे मुलाच्या वडिलांनी संबंधित पोलिस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला होता. दरम्यान, ९ सप्टेंबर रोजी तो पंधरा वर्षीय मुलगा येथील रेल्वेस्थानकावर मिळून आला आहे.

येथील रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर कर्तव्य बजावत असलेल्या रेल्वे पोलिस कर्मचारी विजय पल्हाडे यांना बेपत्ता झालेला मुलगा आढळून आला. त्यानंतर त्यांनी मुलाची विचारपूस केली असता, त्याने सुमित महेंद्र काळे वय पंधरा वर्षे रा. रवीकिरण पार्क पिंपराळा शिवार जळगाव खान्देश असे नाव व पत्ता सांगितला. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी जळगाव खान्देश पोलिसांची संपर्क साधून या मुलाचे वडिलांशी संपर्क साधला. त्यांना शेगावला बोलवून येथील रेल्वे पोलिस ठाण्यात त्या मुलाला वडील महेंद्र काळे यांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे घर सोडून आलेला हा मुलगा पालकांना सुखरूप मिळाला आहे. त्यामुळे त्यांनी रेल्वे पोलिसांचे आभार मानले. रेल्वे पोलीस ठाण्याचे ठाणेदार पी. बी.मगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ विजय पल्हाडे, गजानन वैतकार, संजय चव्हाण, महिला पोलिस हवालदार रेखा वानखडे यांनी ही कामगिरी बजावली आहे.

बातम्या आणखी आहेत...