आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासमृद्धीच्या पॅकेज क्रमांक ७ (बुलडाणा जिल्हा हद्द) मध्ये खडकपूर्णा नदीवरील एका बाजूचा पुल येत्या पंधरा दिवसात तयार होणार आहे. महामार्ग सुरू झाल्यास या भागातून एकेरी मार्गाने वाहतूक वळवली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. वाशीम जिल्ह्यातील काही ठिकाणी जवळपास ३६ किमी अंतर एकेरी रस्त्यावरून पूर्ण करावे लागणार आहे.
बहुप्रतिक्षित, विदर्भ आणि मराठवाड्यासाठी विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण असलेल्या समृद्धी महामार्ग सुरू करण्याचे अनेक मुहूर्त आतापर्यंत हुकले. कधी काम अपूर्ण राहिले तर कधी अपघात झाले. पण लोकार्पण करण्याचा मुहुर्त कधी ठरला नाही. मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः चालक बनुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोमवारी येऊन गेले अन् नागपूर ते शिर्डी पर्यंतचा समृद्धी महामार्ग बघून गेले. त्यामुळे हा महामार्ग निश्चितच लवकर रहदारीस सुरु होणार आहे. या महामार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण हाेत आहे.
सुरुवातीला १ मे महाराष्ट्र दिनी हा महामार्ग सुरू होणार असल्याची चर्चा होती. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार असताना स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी महामार्ग सुरू करण्याचा मुहूर्त निश्चित झाला. परंतु मागील वर्षात जेजे मुहूर्त ठरले ते या ना त्या कारणाने रद्द झाले होते. आता नव्याने या महामार्गाच्या लोकार्पणाचा मुहूर्त निश्चित झाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर ते शिर्डी पर्यंतच्या तयार समृद्धी महामार्गाचा आढावा घेतला आहे. त्यांच्याच नेतृत्वात या महामार्गाच्या संदर्भातील अनेक बैठका झाल्या आहेत.
समृद्धी महामार्गाची घोषणा २०१४ साली
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची घोषणा २०१४ साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. हा महामार्ग ७०१ किमीचा आहे व राज्याची १० जिल्हे व २४ तालुके व ३९२ गावातून जातो. या मार्गाचे प्रत्यक्ष काम २०१६ साली सुरू झालं असून या महामार्गावर ५५ हजार कोटी रुपये इतका खर्च झाला आहे. या मार्गाचे भूसंपादन सर्वात जलद झाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.