आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्यवस्थ:शॉक लागल्याने म्हैस दगावली; महिला अत्यवस्थ

डोणगावएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील सावजी गल्लीच्या बाजूला असलेल्या अंधारवाडीतील हायमास्ट लाइटच्या लोखंडी पोलमध्ये अचानक वीज प्रवाह उतरला. त्याचवेळी वीज प्रवाहीत खांबाला खेटणाऱ्या म्हशीचा शॉक लागून मृत्यू झाला. तर म्हशीला वाचविण्यासाठी गेलेल्या ५५ वर्षीय महिलेस शॉक लागल्याने तीची प्रकृती अत्यवस्थ झाली. ही घटना २३ जूनच्या संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास घडली.

अंधारवाडीत राहणारे रामभाऊ सोनुने यांच्या घराच्या बाजूला काही महिन्या अगोदर जिल्हा परिषद निधी मधून हायमास्ट लाईट बसविण्यात आला आहे. मात्र, पावसामुळे हायमास्ट लाइटच्या लोखंडी खांबात वीज प्रवाह उतरला होता. त्याचवेळी रामभाऊ सोनुने यांची म्हैस खांबाला खेटायला गेली असता तीला जबर शॉक लागला. त्यातच म्हशीचा मृत्यू झाला. यावेळी म्हैस हातपाय का खोरत आहे, हे पाहण्यासाठी गेलेल्या केसरबाई रामभाऊ सोनुने यांनाही शॉक लागला. त्यामुळे त्यांना अत्याबस्थेत खाजगी दवाखान्यात उपचारार्थ दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे यावेळी वीज पुरवठा खंडीत करण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीस सुद्धा शॉक लागला आहे.