आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लीग क्रिकेट स्पर्धा:बुलडाणा वॉरिअर्स संघ ठरला विजेता; चिखली चॅलेंजर्स उपविजेता, लिगल प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा

बुलडाणा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुलडाणा लिगल वॉरिअर्स या वकिल संघाने विजेतेपद पटकावले आहे. तर दुसरीकडे चिखली चॅलेंजर्स संघाने अंतिम सामन्यात जोरदार झुंज देताना उपविजेतेपदाचा मान पटकावला आहे. राहुल मेहेर स्पर्धेचा सर्वोत्तम फलंदाज तर जावेद चौधरी सर्वोत्तम बॉलरचा मानकरी ठरला.

या स्पर्धेत जिल्ह्याच्या न्यायिक वर्तुळातील न्यायाधीश, वकील व कर्मचाऱ्यांचे तब्बल अठरा संघ सहभागी झाले होते. येथील जिजामाता प्रेक्षागर, जिल्हा क्रीडा संकुल व एडेड हायस्कूलच्या मैदानावर २६ व २७ मार्च रोजी दहा ओव्हर्सचे सामने पार पडले. अंतिम सामन्यात ॲड दर्शन बरडे यांच्या नेतृत्वात बुलडाणा लिगल वारीअर्सची गाठ यंगड कर्णधार असलेल्या चिखली चॅलेंजर्स संघाशी पडली. दमदार फलंदाजी करणारा शिवशंकर सावळे सामनावीर ठरला आहे.

दरम्यान, जिल्हा न्यायालयात स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा पार पडला. यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्नील खटी, जिल्हा न्यायाधीश आर. एन. मेहरे, एस. व्ही. खोंगल, पी. ए. साने, एस. व्ही. केंद्रे, बुलडाणा वकील संघाचे अध्यक्ष ॲड विजय सावळे, जिल्हा सरकारी वकील आशिष केसाळे यांची उपस्थिती होती. यावेळी स्पर्धेच्या आयोजनासाठी परिश्रम करणारे अँपायर्स, समालोचक, स्कोअरर, यांचाही सत्कार करण्यात आला. स्पर्धेच्या आयोजनासाठी न्यायाधीश वृंद, न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग अमोल देशपांडे, बाळू शिंदे, वकील संघाचे पदाधिकारी व सदस्यांनी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...