आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवकाचा मृत्यू:टायर फुटल्याने कार उलटली; देऊळगावराजा ते जाफ्राबाद रोडवर भरधाव वेगात कार गतिरोधकावर आदळली; एक जखमी

देऊळगावराजा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भरधाव जाणाऱ्या धावत्या कारचे अचानक टायर फुटल्याने कार गतिरोधकावर जावून पलटी झाली. या अपघातात कारखाली सापडल्याने एका २२ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला. देऊळगावराजा ते जाफ्राबाद रोडवरील ग्रामीण रुग्णालयासमोर ४ एप्रिलच्या मध्यरात्री हा अपघात घडला. पवन गजानन खांडेभराड २२, रा.पिंपळगाव चिलमखॉ असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव असून कैलास खूपसे वय ३५ हा गंभीर जखमी झाला आहे.

तालुक्यातील पिंपळगाव चिलमखॉ येथील पवन खांडेभराड व कैलास खुपसे हे दोघे कारने मित्राला सोडण्यासाठी जालना येथे गेले होते. दरम्यान, रात्री घरी परत येत असताना ग्रामीण रुग्णालयासमोर कारचे अचानक टायर फुटले. या अपघातात चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे कार गतीरोधकावर जावून आदळून पलटी झाली.

या अपघातात कार चालक पवन आणि कैलास दोघे कारखाली दबले. ग्रामीण रुग्णालय आणि पोलिस स्टेशन हाकेच्या अंतरावर असल्याने दोघांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी तपासणी करून पवनला मृत घोषित केले. मृत पवन हा स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. तर जखमी कैलास खुपसे हे कृषी सहाय्यक आहेत. कैलास खुपसे यांच्यावर जालना येथे उपचार सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...