आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑल इंडिया पँथर सेनेचे तहसीलदारांना निवेदन:भीमा कोरेगाव दंगलीतील दाखल गुन्हे रद्द करावे

खामगाव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भीमा कोरेगाव दंगलीनंतर महाराष्ट्रात हजारो भीमसैनिकांवर दाखल केलेले गुन्हे स्वतंत्र जी आर काढून तत्काळ रद्द करावे, यासह विविध मागणीसाठी ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने २९ जुलै रोजी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात नमूद केले आहे की, महाराष्ट्र सरकारने भीमा कोरेगाव आंदोलनातील भीमसैनिकांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याची वाट न पाहता स्वतंत्र जी आर काढत या आंदोलक भीमसैनिकांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, नांदेड जिल्ह्यातील तामसा येथील २७ निरपराध भीमसैनिकांनी दाखल असलेले गुन्हे रद्द करत त्यांची निर्दोष मुक्तता करावी, राज्य सरकारने कोर्टात भूमिका मांडावी, दलित अत्याचार थांबले पाहिजेत.

म्हाळशी जि.हिंगोली येथील दीक्षा नामक मुलीला विष पाजून जातीयवादी कुटुंबाने हत्याकांड केलेल्या आरोपींवर कलम ३०२ अंतर्गत कार्यवाही करावी, आरोपींना फाशी झाली पाहिजे यासह विविध मागण्यांचा निवेदनात समावेश करण्यात आल्या आहेत. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष प्रकाश धुंदळे, अतुल इंगळे, अजय गवई, विनोद कळसकार, अक्षय जोगदंड, करण त्रिभुवन, सिद्धार्थ बोदडे, कमलेश वारे, प्रशिक उमाळे, अमर जाधव, अरविंद भोजने, योगेश रायपूर आदींच्या स्वाक्षरी आहेत.

बातम्या आणखी आहेत...