आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपोषण:सफाई कामगार संघटनेचे चार दिवसांपासून उपोषण सुरूच ; उपोषणाला समतेचे निळे वादळ संघटनेचा पाठिंबा

मलकापूर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील सफाई कामगार संघटनेच्या वतीने गोकुल मोहन रानवे व अशोक गुलाब ढोलकर यांनी पालिका कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ६ जून पासून पालिकेसमोर उपोषण सुरू केले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस उजाडला आहे. परंतु अद्याप या उपोषणाची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे सफाई कामगारांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, समतेचे निळे वादळ या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगरसेवक अशांत वानखेडे यांनी पाठिंबा दिला आहे. उपोषणास बसलेल्या आंदोलनकर्त्यांची प्रकृती खालावली असून त्यांच्याशी बोलणी देखील संबंधित अधिकाऱ्यांनी केली नसल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले. सफाई कामगारांच्या मागण्यांची पूर्तता न केल्यास आंदोलन करू, असा इशारा समतेचे निळे वादळ संघटनेने दिला आहे. अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेच्या वतीने उपोषणास पाठिंबा दिला. यावेळी मोहन खराटे, दिलीप इंगळे, राजेश रायपूरे, दत्तू पहेलवान, गोकुल रानवे, अशोक ढोलकर, राजेश जाझोट, हुकुमचंद ढंडोरे, रमेश जाझोट, गणेश टाक, संतोष चंडाले, मानसिंग सारसर, धनराज ढोलकर, राजू डागोर, गिरधारी जाझोट, दिलीप टाक, विशाल टाक, महादेव टुनलाईट, सुरेश सारसर, विशाल सारसर, गोलू सारसर, प्रल्हाद टाक, सुनील ढोलकर, किशोर ढोलकर यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...