आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 जणांविरुद्ध गुन्हा:तीन दिवसांपासून बेपत्ता विवाहितेचे प्रेत शेतातील विहिरीत आढळले ; आत्महत्या केल्याची तक्रार

देऊळगाव महीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या विवाहितेचे प्रेत आज गारखेड शिवारातील शेतातील विहिरीत आढळून आले. त्यानंतर मृत विवाहितेच्या माहेरच्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सासरच्या सहा जणांविरुद्ध मरणास कारणीभूत असल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला. तालुक्यातील गारखेड येथील २८ वर्षीय विवाहिता शुभांगी नितीन शिंगणे ही कोणाला काहीही न सांगता ३ सप्टेंबर रोजी भरून निघून गेली होती. याप्रकरणी तिच्या पतीने दिलेल्या फिर्यादीवरून देऊळगाव राजा पोलिस स्टेशनला हरवल्याची नोंद घेण्यात आली होती. दरम्यान, गारखेड येथील शेत शिवारात एका विहिरी मध्ये तिचा मृतदेह ५ सप्टेंबर रोजी सकाळी आढळला. विवाहितेचा मृतदेह गारखेड येथील शिवारामध्ये एका विहिरीत असल्याची वार्ता पसरताच गावकऱ्यांसह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन या संदर्भात देऊळगाव राजा पोलिस स्टेशनला माहिती दिली.

त्यानंतर देऊळगाव राजा पोलिसांनी पंचनामा करून मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यासाठी मृतदेह ताब्यात घेतला. मात्र उत्तरीय तपासणी ही बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्याची मागणी मृत विवाहितेच्या माहेरचे संजय रुपराव शेळके वय ४५ राहणार शिरपूर यांनी केली. त्यांनी लग्नानंतर शुभांगी शिंगणे हिला एक वर्षापर्यंत सासरच्या लोकांनी चांगली वागणूक दिली. त्यानंतर तिला घरातील कामे नीट येत नसल्याचे कारणावरून मारहाण व माहेरवरून घर बांधण्यासाठी पैसे आणण्याचा तगादा लावून तिला सतत त्रास देऊन आत्महत्या प्रवृत्त केले, केल्याची फिर्याद दिली. त्यावरून नितीन प्रकाश शिंगणे पती, ज्ञानेश्वर प्रकाश शिंगणे, प्रकाश साहेबराव शिंगणे, बेबी प्रकाश शिंगणे सर्व राहणार गारखेड तालुका देऊळगाव राजा तसेच किरण दिलीप वायाळ, दिलीप गुलाबराव वायाळ राहणार संभाजीनगर चिखली यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलिस निरीक्षक जयवंत सातव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दत्तात्रय वाघमारे करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...