आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जिल्ह्याच्या तापमानाचा पारा 41 अंशाच्यावर; उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिकांना आरोग्य विभागाने दिला सल्ला

बुलडाणा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात मार्च महिन्यापासुन ऊन्हाचा पारा चढला आहे तो अजुन कमी होतांना दिसत नाही. २ एप्रिल पर्यंत तापमान कमी होण्याची शक्यता होती. मात्र तापमान आजघडीला ३९ ते ४१ अंश सेल्सीअस पर्यंत पोहोचले आहे. येत्या पाच दिवसात पुन्हा तापमान वाढण्याची शक्यता हवामान तज्ज्ञ मनेश युदुलवार यांनी व्यक्त केली आहे.

वाढत्या तापमानामुळे वातावरणात बदल होण्याची शक्यता सध्या तरी नाही. पाऊस पडण्याचा अंदाजही सध्या नाही. मात्र ऊन्हामुळे आरोग्याव परिणाम होण्याचा अंदाज आरोग्य विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे काय करावे व काय करु नये, याचे सल्लेही आरोग्य विभागाने देण्यास सुरुवात केली आहे.

बचावासाठी काय करायला हवे पुरेसे पाणी पित रहावे, तहान लागलेली नसली तरी जास्तीत जास्त पाणी पिण्यात यावे, केवळ हलक्या रंगाचे सुती कपड्यांचा वापर करावा, हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावे, बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बूट व चपलांचा वापर करण्यात यावा, प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत घ्यावी, उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करण्यात यावा.

तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकण्यात यावा. चक्कर येत असल्यास किंवा आजारी वाटल्यास त्वरित डॉक्टरांकडे जावे. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनवण्यात आलेली लस्सी, तोरणी, लिंबुपाणी, ताक आदींचा नियमित वापर करण्यात यावा.

बातम्या आणखी आहेत...