आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुभाजक:मोताळा ते बुलडाणा मार्गावरील दुभाजक तुटले ; या ठिकाणी मोठा अपघात घडण्याची शक्यता

मोताळा20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील बस स्थानकाजवळ असलेल्या दुभाजकाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुभाजक क्षतिग्रस्त झाले असून अज्ञात वाहनाच्या धडकेत दुभाजक तुटल्याने रात्रीच्या वेळी दुभाजक आहे की नाही, हे वाहनधारकांना कळत नाही त्यामुळे. त्यामुळे या ठिकाणी मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दुभाजकाची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी वाहनधारकांसह नागरिक करत आहेत. मोताळा ते बुलडाणा या मुख्य मार्गावर बस स्थानकासमोर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे येथे वाहतूक सुरळीत राहण्यासाठी तसेच सुरक्षेच्या दृष्टीने बस स्थानकासमोर बुलडाणा मार्गावर एचडीएफसी बँकेपर्यंत दुभाजक तयार करण्यात आले आहे. मागील काही दिवसांपूर्वी अज्ञात वाहनाने या दुभाजकाला धडक देऊन हे दुभाजक तोडून टाकले आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी येथे दुभाजक आहे की नाही वाहन धारकांना दिसत नाही. त्यामुळे या दुभाजकाची दुरुस्ती करून त्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावणे गरजेचे झाले आहे. जेणेकरून वाहन धारकांना येथे दुभाजक असल्याचे माहित झाल्यावर अपघात घडणार नाहीत. तरी भविष्यातील अपघात टाळण्यासाठी या दुभाजकाची दुरुस्ती करून तेथे दिशादर्शक फलक लावण्याची मागणी वाहन धारकांसह नागरिक करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...