आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा परिषदे अंतर्गत ग्रामविकास अधिकारी संवर्गामधून विस्तार अधिकारी कृषी या पदावर पदोन्नत्या करण्यात आल्या होत्या. मात्र या सेवा ज्येष्ठता यादीच आता आयुक्तांच्या दारात पोहोचल्याने त्यांना पुन्हा यादी तयार करण्याचे आदेश दिले आहेत. सात ग्रामविकास अधिकारी यांनी याबाबत विभागीय आयुक्त यांच्याकडे अपील दाखल केले होते. त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या पदोन्नत्या व बदल्यांबाबतचा कारभार पुन्हा एकदा चव्हाटयावर आला आहे.
जिल्हा परिषद बुलडाणा अंतर्गत १८ जुलै २०२२ रोजी सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध केली होती. सदर सेवाज्येष्ठता यादी नियमबाह्य असून नियमानुसार पदोन्नतीसाठी पात्र असलेल्यांवर सेवाज्येष्ठता यादीत अन्याय झाला असल्याने त्याविरूद्ध अरविंद टेकाडे ग्रामविकास अधिकारी पंचायत समिती बुलडाणा व जिल्ह्यातील इतर सात ग्रामविकास नुसार विस्तार अधिकारी (कृषी) या पदावर अधिकारी यांनी विभागीय आयुक्त अमरावती यांच्याकडे अपिल दाखल केले होते. सदर अपिल दाखल झाल्यावर १० ऑगस्ट २०२२ रोजी विभागीय आयुक्त, अमरावती यांनी बुलडाणा जिल्हा परिषदेच्या १८ जुलै २०२२ च्या सेवाज्येष्ठता यादीवर तसेच त्या यादीनुसार करण्यात येणाऱ्या पुढील कार्यवाहीवर स्थगनादेश (स्टे) पारीत केला होता.
मात्र १० ऑगस्ट २०२२ च्या विभागीय आयुक्तांच्या स्थगनादेशाला न जुमानता बुलडाणा जिल्हा परिषदेने १२ ऑगस्ट २०२२ रोजी सेवाज्येष्ठतेची अंतिम यादी प्रसिध्द केली व त्यानुसार १७ ऑगस्ट सेवाज्येष्ठता यादी तयार करताना शासन निर्णयाचे पालन न झाल्यामुळे पदोन्नतीस पात्र असलेल्यांवर अन्याय झाला होता. त्यामुळे याबाबत विभागीय आयुक्त यांच्याकडे अपिल दाखल केले होते. सदर अपिलावर आलेला निर्णय हा न्याय देणारा असून या निर्णयाचे पालन करत आमच्यावरील अन्याय लवकर दूर व्हावा व पदोन्नतीस पात्र असलेल्यांना पदोन्नती मिळावी ही अपेक्षा अरविंद टेकाडे यांनी व्यक्त केली.
आदेशात निर्देशानुसार कार्यवाही करण्याचे म्हटले आहे सेवाजेष्ठता यादीवर विभागीय आयुक्त अमरावती यांच्याकडे दाखल केलेल्या अपिलावर दिलेल्या निर्णयात नमूद आहे की, जिल्हा परिषद बुलडाणा अंतर्गत ग्रामविकास अधिकारी या संवर्गातून विस्तार अधिकारी (कृषी) या पदावर पदोन्नती देताना जी सेवाज्येष्ठता यादी ग्राह्य धरली होती. त्या यादीला अमरावती विभागीय आयुक्त यांनी स्टे दिलेला असतानाही अंतीम यादी प्रसिध्द करणे व त्यानुसार सात पदोन्नती करणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. १२ ऑगस्ट २०२२ रोजीची अंतिम सेवाज्येष्ठता यादी नुसार करण्यात आलेल्या पदोन्नती बाबत पुनर्विलोकन करून पुन्हा अंतीम यादी प्रसिध्द करून त्यानुसार पदोन्नती बाबतचा निर्णय घेणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. आदेश२७ ऑक्टोबर २०२० मध्ये दिलेल्या निर्देशांचे पालन न करता केलेल्या असल्याचे स्पष्ट केले. तसेच सदर पदोन्नती आदेश चुकीचे असल्याने प्रकरण क्र. ७६ व ७७ मधील दिलेल्या आदेशामध्ये नमूद निर्देशानुसार कार्यवाही करून पदोन्नती बाबतचा निर्णय घेण्याची कार्यवाही करण्याचे आदेशित केले. -अरविंद टेकाडे, अपीलार्थी
कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता यादी तयार करतानाची यादी चुकीची ग्रामविकास अधिकारी या संवर्गामधून विस्तार अधिकारी (कृषी) या पदावर पदोन्नती देताना ज्यादिवशी संबंधित ग्रामविकास अधिकारी या पदावर रुजू होतो त्या दिवसापासूनची सेवाज्येष्ठता गृहीत धरण्याबाबत शासन निर्णयात नमूद आहे. तर ग्रामसेवक या पदावरून सेवाप्रवेशोत्तर परीक्षेद्वारे ग्रामविकास अधिकारी पदावर पदोन्नती देण्यात येते. त्यामुळे बुलडाणा जिल्हा परिषदेने ग्रामविकास अधिकारी संवर्गातून विस्तार अधिकारी (कृषी) या पदावर पदोन्नती देण्यासाठी सेवाज्येष्ठता यादी तयार करताना संबंधितांची ग्रामविकास अधिकारी पदावर रुजू झाल्याची तारीख ही सेवाजेष्ठतेत गृहीत धरणे अपेक्षित होते. २०२२ रोजी ग्राम विकास अधिकारी या संवर्गातून विस्तार अधिकारी (कृषी) या पदावर ७ पदोन्नती आदेश काढले होते अशी माहिती अपिलार्थीनी दिली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.