आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपोषण:आश्वासनानंतर दुसऱ्याच दिवशी कोलद ग्रामस्थांचे उपोषण स्थगित ; लाभार्थ्याची घरे पक्की

संग्रामपूर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गरजू लाभार्थ्यांना प्रपत्र ड यादीमधून प्रथम लाभ देवून त्यांना घरकूल देण्यात यावे, या मागणीसाठी कोलद येथील असंख्य लाभार्थ्यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर ७ जून पासून उपोषण सुरू केले होते. दरम्यान, बुधवारी दुसऱ्याच दिवशी लेखी आश्वासनाने या उपोषणाची यशस्वी सांगता करण्यात आली आहे. तालुक्यातील कोलद येथील प्रपत्र ड घरकुल लाभार्थ्यांची यादी पूर्णत: चुकीची बनवण्यात आली आहे. ज्या लाभार्थ्याची घरे पक्की आहेत. अशा लाभार्थ्यांना घरकुलांचा लाभ देण्यात आला आहे. त्यामुळे पात्र लाभार्थी घरकुलापासून वंचित राहिले आहेत. अशा लाभार्थ्यांना अपात्र न करता त्यांना घरकुलांचा लाभ द्यावा. तसेच ज्यांची घरे मातीची आहेत व अपंग, विधवा, भूमीहीन अशा लाभार्थ्यांना लाभ द्यावा. तसेच जे लाभार्थी कित्येक वर्षापासून अतिक्रमणाच्या जागेत राहत आहेत. अशा लाभार्थ्यांच्या नावाने जागेचा नमुना आठ अ करून देण्यात यावा. जेणेकरून त्यांचा घरकुल योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. शिवाय यादीतील पुढील लाभार्थ्यांना सुद्धा लाभ मिळेल. याबाबत योग्य ती चौकशी व सर्व्हे करून गरजू लाभार्थ्यांना प्रथम लाभ द्यावा. या मागणीसाठी २३ लाभार्थ्यांनी ७ जून पासून उपोषण सुरू केले होते. दरम्यान, आज उपोषण मंडपास तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर, पंचायत समितीचे अधिकारी, स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर व सामाजिक कार्यकर्ते भाऊ भोजने यांनी भेट देवून आश्वासनाने या उपोषणाची सांगता केली.

बातम्या आणखी आहेत...