आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगीची धग:तुलसीच्या गोदामातील आगीची धग अजूनही कायम ; गोदामाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान

खामगाव24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील औद्योगिक वसाहतीमधील श्री तुलसीकृपा अॅग्रोटेक प्रा. लि.च्या गोदामाला ९ जून रोजी सकाळी आग लागली होती. ही आग २४ तासांचा कालावधी उलटून गेला तरी पूर्णपणे विझलेली नाही. ही आग विझविण्यासाठी खामगाव, शेगाव व नांदुरा येथील अग्निशमन दलाच्या जवानांना बाेलावण्यात आले होते. जवळपास ७० बंबांच्या माध्यमातून या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाण्याचा मारा करण्यात आला. परंतु ही आग अजूनपर्यंत संपूर्णपणे विझलेली नाही. शेगाव व नांदुरा येथील अग्निशमन दलाच्या गाड्या ९ जून रोजी रात्रीच्या सुमारास परत पाठवण्यात आल्या आहेत. सद्यःस्थितीत खामगाव न. प.च्या अग्निशमन दलाच्या दोन गाड्या व अग्निशमन अधिकारी नागेश रोठे, एस. डब्ल्यू. शिंदे, गोपाळ फंदाट, आत्माराम घुले, सुरेश घाडगे, फायरमन राजेश जोगदंड, ओम बोराखडे, किशोर गवई, वासुदेव तायडे, मोहन हागे, नितीन भातखेडे आदी कर्मचारी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. या आगीत ३ हजार गाठी व ५० हजार बारदाण्याची राखरांगोळी झाली आहे. गोदामाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही आग ८ जूनच्या रात्री लागली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या आगीत किती रुपयाचे नुकसान झाले, याची निश्चित आकडेवारी अद्याप समजू शकलेली नाही.

बातम्या आणखी आहेत...