आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वनपरिक्षेत्र:वनपरिक्षेत्र अधिकारी लाच घेताना जाळयात अडकला

बुलडाणा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पकडलेले लाकडाचे वाहन सोडण्यासाठी ६ हजार रुपये दंडासह २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना जळगाव जामोद येथील वनपरिक्षेत्र अधिकारी भगतराम कटारिया (४७) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई शुक्रवारी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास वन परिक्षेत्र कार्यालयात करण्यात आली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्याच्या वन विभागात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शुक्रवारी जळगाव जामोद पोलिस ठाण्यात कटारिया विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाच प्रकरणातील आरोपी कटारिया हे अकोला जिल्ह्यातील अकोट येथील रहिवासी आहेत. दरम्यान १० मे रोजी लाकडाची वाहतूक करणारे वाहन वन कर्मचारी देवकर यांनी पकडून ते जळगाव जामोद वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात जमा केले होते. हे वाहन सोडण्यासाठी मालकाने कटारिया यांची भेट घेतली. त्यावेळी कटारिया यांनी स्वतःसाठी ७ हजार रुपये व इतरांसाठी १२ हजार रुपये तसेच दंडाचे ६ हजार रुपये, अशी एकुण २५ हजार रुपयांची मागणी वाहन मालकाकडे केली. परंतु, वाहन मालकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रितसर तक्रार दाखल केली. या तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली. त्यानंतर एसीबीच्या पथकाने जळगाव जामोद येथील वनपरिक्षेत्र कार्यालय परिसरात सापळा रचला.

यावेळी वाहन मालकाकडून २५ हजार रुपयाची लाच स्वीकारताना कटारिया यांना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. रात्री उशिरा कटारिया यांच्या विरोधात जळगाव जामोद ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई एसीबीचे पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड, देविदास घेवारे व अप्पर पोलिस अधीक्षक अरुण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीचे पोलिस उप अधीक्षक एस.एन. चौधरी, पोहेकॉ. विलास साखरे, पो.ना. मोहम्मद रिजवान, रवींद्र दळवी, प्रवीण बैरागी, अझरुद्दीन काझी, चालक अर्शद शेख यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...