आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोळी जेरबंद:दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली टोळी  जेरबंद; दोन वाहनासह 7 लाख 11 हजारांचा माल जप्त

खामगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेगाव ते वरवट मार्गावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आठ जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने जेरबंद केले आहे. यावेळी त्यांच्या ताब्यातून दुचाकी व चारचाकी वाहनासह एकूण ७ लाख १० हजार ४५० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी रात्रीच्या सुमारास करण्यात आली आहे.

शेगाव शहर पोलिस स्टेशन अंतर्गत अवैध धंदे व गुन्ह्याच्या शोधासाठी स्थागुशाचे पोलिस निरीक्षक बळीराम गीते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्त घालीत होते. गस्त घालीत असताना शेगाव वरवट मार्गावर भारत गॅस गोडाऊन जवळ अंधारात एम एच ४८एम / ८७९९ या क्रमांकाचे वाहन लाईट बंद करून उभे होते.

तसेच या वाहनाच्या बाजूला एम एच २८ /बिडी / ५८४४ या क्रमांकाच्या दुचाकीवर बसलेले दोन व्यक्ती हे चारचाकी वाहनात बसलेल्या व्यक्तीशी बोलत असल्याचे पथकाला दिसून आले. या दोन्ही वाहनांना पाहुन पोलिसांना संशय आला. त्यानंतर पोलिसांनी संशयावरून विशाल गोपाल इंगळे वय २३ रा. पारंबी ता. मुक्ताईनगर, नीलेश मधुकर धामोडे वय ३४ रा. कुन्हा, तालुका मुक्ताईनगर, परमेश्वर रघुनाथ भोला वय २१ रा. काकोडा, तालुका मुक्ताईनगर, भूषण प्रभाकर चांडक वय २१ रा. कुल्ला तालुका मुक्ताईनगर, आरिफ फरीद तडवी वय २४ रा. चंदनखेडा तालुका मुक्ताईनगर, प्रथमेश सुरेश चोपडे वय २१ रा. कुन्हा ता. मुक्ताईनगर, मुफिस अहमद अब्दुल रफिक वय ३४ रा. नर्सरी पुरा जळगाव जामोद, अवदेश रामेश्वर पवार वय २३ रा. वाडी ता. जळगाव जामोद यांना ताब्यात घेऊन त्यांच्या वाहनांची झडती घेतली असता त्यांमध्ये लालसर मिरची पूड असलेली पॉलिथिन पिशवी, दहा फूट लांबीची दोरी, सोनेरी रंगाचे धातूचे गोल पन्नास शिक्के, दोन लाकडी दांडे, एक लोखंडी तलवार, एक चाकू, एक लोखंडी सुरा, बारा मोबाईल, रोख १५०० रुपये, चार चाकी वाहन व एक दुचाकी वाहन असा एकूण ७ लाख १० हजार ४५० रुपयाचा माल जप्त केला.

अटक केलेले आरोपी हे संगनमताने शेगाव शहरात लूटपाट करण्याच्या इराद्याने दरोडा टाकण्याच्या पूर्वतयारीत असताना मिळून आले. प्रकरणी शेगाव शहर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...