आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील कृषी उत्पन्न बाजार समिती ही बुलडाणा जिल्हयातील सर्वात मोठी बाजार समिती असून या बाजार समितीवर महाविकास आघाडीचे प्रशासक मंडळ नेमण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्व नेतेमंडळींनी सहकार्य केले. बाजार समितीचे नवनियुक्त प्रशासक मंडळ शेतकरी, कामगार, अडते, व्यापारी यासह सर्व घटकांच्या विविध समस्यांचे निराकरण करुन पारदर्शकपणे कार्य करतील. बाजार समितीच्या सर्व घटकांना न्याय देण्यासाठी प्रशासक मंडळ कटिबद्ध राहील, अशी ग्वाही माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी दिली.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ५ मे रोजी बाजार समितीचे मुख्य प्रशासक डॉ.सदानंद धनोकार यांचा पदग्रहण समारंभ पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संजय अवताडे, शहर प्रमुख रमेश भट्टड, युवा सेनेचे नीलेश देवताळू, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे माजी नगराध्यक्ष गणेश माने, विकास चव्हाण, महेंद्र पाठक, प्रहार संघटनेचे गजानन लोखंडकार, कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष विजय काटोले, माजी नगराध्यक्षा सरस्वती खासने आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बाजार समितीचे मुख्य प्रशासक डॉ. सदानंद धनोकार, राष्ट्रवादीचे अशोक हटकर, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष सुरेश वावगे यांनी विचार व्यक्त केले.
त्यानंतर बाजार समितीचे मुख्य प्रशासक म्हणून डॉ.सदानंद धनोकार यांनी प्रशासक महेश कृपलानी यांच्याकडून पदभार स्वीकारला. नवनियुक्त मुख्य प्रशासक डॉ.सदानंद धनोकार व प्रशासक अशोक हटकर, पुंजाजी टिकार, दामोदर ताठे, सुरेश वावगे, श्रीराम खेलदार, सुरेशसिंह तोमर या प्रशासकांचा माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते सत्कार केला. यावेळी माळी सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रल्हादराव बगाडे, महादेव बोचरे, सुरेश बगाडे, गोपाल सातव, मधुकर बगाडे, सचिन वानखडे, अनंता सातव, बाजार समितीमधील अडते व्यापारी असोसिएशन तर्फे बनवारीसेठ टिबडेवाल, चकासेठ संघवी, अजय खंडेलवाल, अजय अग्रवाल, संजय झुनझुनवाला, विवेक मोहता आदी व्यापारी अडते बांधवांनी तसेच शिवसेनेतर्फे उपजिल्हाप्रमुख संजय अवताडे, शहराध्यक्ष अॅड. रमेश भट्टड, युवा सेनेचे नीलेश देवताळू यांनी राष्ट्रवादीतर्फे माजी नगराध्यक्ष गणेश माने, विकास चव्हाण, महेंद्र पाठक, प्रहार संघटने तर्फे गजानन लोखंडकार यांनी मुख्य प्रशासक डॉ.सदानंद धनोकार व प्रशासकांचे अभिनंदन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.