आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घोषणा:सरकारने नुकसानभरपाईची घोषणा केली, मात्र शेतकऱ्यांना अद्यापही मदत नाही

अंढेरा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पीक विमा काढलेल्यांना शेतकऱ्यांना सरसकट विम्याचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा नेत्या भारती इंगळे यांनी केली आहे

उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या ऋतूंमध्ये अवकाळी पाऊस व वादळ अशा संकटामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. अतिवृष्टीमुळेही शेतकरी होरपळून निघाले आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे.

राज्य सरकारने नुकसान भरपाईची घोषणा केली. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. पीक विमा काढलेल्यांपैकी काही शेतकऱ्यांना विमा मिळण्यास सुरुवात झाली. परंतु विमा कंपनीने शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना विमा दोनशे किंवा पाचशे रुपये मिळाला आहे. बरेच शेतकरी विम्यापासून वंचित आहेत, असे इंगळे यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम लवकर मिळावी, अशी मागणी भारती इंगळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

बातम्या आणखी आहेत...