आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराओबीसीच्या रद्द झालेल्या राजकीय आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथे भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या वतीने वरीष्ठ नेत्याच्या मंथन बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीसाठी माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.यावेळी फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारने राज्यातील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची अक्षरशा खून केला. कारण न्यायालयाने त्यांना सात वेळा संधी देऊनही ते न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू सक्षमरीत्या मांडू शकले नाहीत, असा आरोप केला.
बैठकीला प्रमुख उपस्थिती असलेले भाजपचे उपाध्यक्ष तथा आमदार डॉ. संजय कुटे यांनी सुद्धा महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवीत हा तर ओबीसींचा घात शासनाने केल्याचे मत व्यक्त केले. ओबीसीच्या आरक्षणासाठी कोणताही आयोग तत्काळ गठीत करण्यात आला नाही, आल्यानंतर त्याला निधी दिला नाही. चुकीचा डेटा कोर्टात दिला, माहीत राज्य आयोगाच्या मार्फत सादर केली नाही. अशा राज्य सरकारच्या अनेक चुकांमुळे न्यायालयाने हा निर्णय दिला. त्यामुळे राज्य सरकारची इच्छा ही आरक्षण देण्याची नव्हती.
असेच सिद्ध होते असा घणाघात आ कुटे यांनी सरकारवर केला. एकीकडे न्यायालयात वेळ काढून न्यायची आणि दुसरीकडे निवडणुकीची तयारी सुरू ठेवत सभांमधून कोणत्याही क्षणी निवडणुका लागतील असे सांगून कार्यकर्त्यांना संदेश द्यायचा, हे काम या सरकारमधील तीन पक्षाच्या नेत्यांनी सातत्याने केले. अशावेळी भाजपचा कार्यकर्ता हा रस्त्यावर उतरून ओबीसींची लढाई लढत होता. परंतु आमचा कार्यकर्ता हा सक्षम असून कोणतीही निवडणूक जिंकण्यासाठी सदैव तयार असतो. त्यामुळे सरकारने कितीही कुटील डाव टाकला तरी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपच जिंकेल असा इशारा डॉ. संजय कुटे यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.