आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तहसीलदारांना निवेदन:लम्पी आजारावर शासनाने तत्काळ उपाययोजना करावी ; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

चिखली22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाळीव जनावरांवर लम्पीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे शासनाने तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी चिखली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.निवेदनात नमुद केले की, सध्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाळीव जनावरांवर लम्पीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे अनेक जनावरे मरण पावत आहेत. शासनाने तात्काळ गावोगावी लसीकरणाची शिबिरे आयोजित करावीत. मागणी मान्य न झाल्यास राष्ट्रवादीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दीपक म्हस्के, प्रदेश प्रतिनिधी शंतनू बोंद्रे, विधानसभा अध्यक्ष प्रमोद पाटील, विभागीय महिला अध्यक्ष डॉ. ज्योती खेडेकर, शहराध्यक्ष रवी तोडकर, जिल्हा सरचिटणीस राम खेडेकर, जिल्हाध्यक्ष ओबीसी सेल सुभाष देव्हडे, जिल्हाध्यक्ष किसान सेल राजीव जावळे, शहर कार्याध्यक्ष रहिम पठान, नगरसेवक प्रशांत ऐकडे, तालुका उपाध्यक्ष दीपक शिंगणे, प्रवीण कांबळे, शारिक शेख, भगवानराव काळे, डॉ. विकास मिसाळ, युवक तालुकाध्यक्ष कृष्णा मिसाळ, प्रमोद चिंचोले, जगन्नाथ वाघ, मलिक सौदागर, प्रशांत डोंगरदिवे, सुरेश पवार, राजेंद्र लहाने, कल्पना केसकर आदींनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...