आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील अवैध धंदे बंद करून वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश लावण्यात यावा, सर्वधर्मीय राष्ट्रसंत व महापुरुषांबद्दल अवमानजनक गरळ ओकणाऱ्यांवर प्रतिबंध लावण्यासाठी स्वतंत्र कायदा तयार करावा, शेतमालाला भाव द्यावा, नाबालिक मुलींच्या अपहरणाची चौकशी करावी, बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्रीवर कारवाई करावी, यासह इतर मागण्यांच्या अनुषंगाने आझाद हिंदचे शिष्टमंडळ अॅड. सतीशचंद्र रोठे यांच्या नेतृत्वात तीन दिवस मंत्रालयात ठाण मांडून होते. त्यावर मंत्रालयीन सचिवालयाकडून चौकशीचे निर्देश देण्यात आले आहेत.
विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी आझाद हिंदच्या शिष्टमंडळाने मंत्रालयातील संबंधित विभागाचे मुख्य सचिव, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे प्रशासकीय व वैयक्तिक स्वीय सहायक, ओसडी, सहसचिव, मुख्य वनपाल यांना २ फेब्रुवारीला मागण्यांच्या अनुषंगाने प्रत्यक्ष भेटी घेत असंख्य पुरावे सादर केले. तक्रारी व निवेदनांच्या अनुषंगाने संबंधित विभागाच्या सचिवालयाने मागण्यांची पूर्तता तथा कारवाईचे निर्देश संबंधित विभागाला दिल्याचे आझाद हिंदच्या बैठकीत जाहीर केले आहे.
तसेच लवकरच बुलडाणा जिल्ह्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि कारवाईचे सत्र सुरू होणार असल्याची माहिती आहे. या वेळी आझाद हिंदच्या शिष्टमंडळात अॅड. सतीशचंद्र रोठे, प्रदेशाध्यक्ष प्रशांत यशवंतराव पाटील, महिला प्रदेश संपर्कप्रमुख सुरेखा निकाळजे, प्रदेश महासचिव संजय एंडोले, सोशल मीडिया इन्चार्ज योगेश कोकाटे, प्रदेश उपाध्यक्ष अरुण पाटील, कोकण प्रदेशाध्यक्ष भाई गणपत चव्हाण यांच्यासह मुंबई प्रदेशचे प्रमुख पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.