आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्णसेवा:गजानन महाराज संस्थानचे रुग्णालय रुग्णसेवेत रूजू ; रुग्णालयात उपलब्ध उपचार सुविधा

शेगाव12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील श्री गजानन महाराज संस्थेद्वारे संचालित वैद्यकीय सेवाकार्यांतर्गत अ‍ॅलोपॅथीक, आयुर्वेदिक व होमियोपॅथीक रूग्णालय, दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामीण आरोग्य सेवा योजना या सर्व मंदिर परिसरातील वैद्यकीय उपक्रमांतर्गत सेवांचे ९ जून, गुरुवार रोजी खामगाव रोड स्थित नव्या रुग्णालयाच्या इमारतीत स्थानांतरण होवून हे रुग्णालये रुग्ण सेवेत रुजू झाले आहेत. या रुग्णालयात उपलब्ध उपचार सुविधा क्षयरोग चिकित्सा, जनरल फिजीशियन चिकित्सा, जनरल सर्जन चिकित्सा, अस्थिरोग चिकित्सा, चर्म रोग चिकित्सा, मनोविकार चिकित्सा, बालरोग चिकित्सा, कान, नाक, घसा चिकित्सा, नेत्ररोग चिकित्सा, स्त्रीरोग चिकित्सा, कर्करोग चिकित्सा, छाती विकार चिकित्सा, दंतरोग चिकित्सा, हृदयविकार चिकित्सा, न्युरोफिजीशियन चिकित्सा, मधुमेह विकार चिकित्सा, मुत्र विकार चिकित्सा, फिजिओथेरपी चिकित्सा, आयुर्वेद खिरोग चिकित्सा, आयुर्वेदिक चिकित्सा, होमियोपॅथीक चिकित्सा, जनरल तपासणी (ओ.पी.डी.) ग्रामीण आरोग्य सेवा केंद्र, रुग्णवाहिका सुविधा इ. सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.या सर्व उपचार सुविधेसाठी श्री संस्थेच्या अधिकृत मानसेवी डॉक्टरांसह विविध चिकित्सा पद्धतीचे मानसेवी तज्ञ डॉक्टर निर्धारित दिवशी ठरलेल्या वेळेत या रुग्णालयात उपलब्ध राहणार आहेत. तरी गोरगरीब, गरजू रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा, तसेच अधिक माहितीसाठी रूग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...