आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंपास:मंडळ अधिकाऱ्याचे घर फोडून 55 हजार लंपास ; ही घटना 2 जून रोजी उघडकीस आली

जानेफळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील मेहकर रोडवर रहिवासी असलेल्या मंडळ अधिकाऱ्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह ५५ हजार २०० रुपयांचा माल लंपास केला आहे. ही घटना २ जून रोजी उघडकीस आली. येथील रहिवासी व डोणगाव येथे कार्यरत असलेले मंडळ अधिकारी भरत वाघ हे आपल्या परिवारासह १९ मे रोजी घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. हीच संधी साधून चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी घरातील लोखंडी व लाकडी आलमारी फोडून त्यातील चांदीच्या असलेल्या काही मूर्त्या व काही रोख रक्कम व असा एकूण ५५ हजार २०० रुपयांचा माल लंपास केला. घरमालक वाघ हे १ जूनच्या रात्री गावावरून परत आले असता त्यांना घराचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोहेकॉ प्रल्हाद टकले व पोलिस कर्मचारी अमोल बोर्डे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली. प्रकरणी घरमालक भरत वाघ यांच तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार राहुल गोंदे यांच्या आदेशाने व पोलिस निरीक्षक संदीप साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार कैलास चतरकर व पोलिस कर्मचारी करत आहे.

बातम्या आणखी आहेत...