आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौकशी:चार दिवसांपासून बापलेकाचे‎ जिल्हा कचेरी समोर उपोषण सुरूच‎

बुलडाणा‎18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सरपंच, ग्रामसेवक व गटविकास‎ अधिकारी यांनी संगनमत करून‎ घरकुल यादीत घोळ केला आहे.‎ त्यामुळे या यादीची चौकशी करून‎ कारवाई करण्यात यावी, या‎ मागणीसाठी शेगाव तालुक्यातील‎ माटरगाव खुर्द येथील गोविंद‎ सूर्यभान वाघ व शिवशंकर गोविंद‎ वाघ या बापलेकांनी ३ मार्च पासून‎ येथील जिल्हाधिकारी‎ कार्यालयासमोर उपोषणास सुरूवात‎ केली आहे. आज त्यांच्या‎ उपोषणाचा चवथा दिवस उजाडला‎ आहे. परंतु अद्यापही त्यांच्या‎ उपोषणाची दखल घेण्यात आली‎ नाही.‎ माटरगाव येथिल रहिवासी‎ गोविंदा वाघ हे दारिद्रय रेषेखालील‎ असून त्यांच्याकडे स्वताचे घर‎ किंवा शेती नाही. त्यामुळे त्यांनी‎ हक्काच्या घरकुलासाठी‎ ग्रामपंचायतीकडे अर्ज केला होता.‎

त्यावेळी घरकुल यादीमध्ये त्यांचे‎ नाव सातव्या क्रमांकावर होते. परंतु‎ सरपंच, ग्रामसेवक व गट विकास‎ अधिकाऱ्यांनी संगनमत करून‎ लाभार्थ्याचे नाव सातव्या‎ क्रमांकावरून ५९ व्या क्रमांकावर‎ टाकले आहे. या बाबत लाभार्थी‎ गोविंद वाघ यांनी अनेक वेळा‎ ग्रामपंचायत प्रशासनाकडे अर्ज‎ दाखल केला.‎ परंतु त्या अर्जाची दखल घेण्यात‎ आली नाही.‎ विशेष म्हणजे ग्रामसेवक व गट‎ विकास अधिकाऱ्यांनी बरीचशी गैर‎ कायदेशीर कामे केली आहेत.‎ त्यामुळे घरकुल यादीत घोळ‎ करणाऱ्यांवर कारवाई करण्यात‎ यावी, या मागणीसाठी माटरगाव‎ खुर्द येथील गोविंद सूर्यभान वाघ व‎ शिवशंकर गोविंद वाघ या‎ बापलेकांनी ३ मार्च पासून येथील‎ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर‎ उपोषणास सुरूवात केली आहे.‎ आज त्यांच्या उपोषणाची चौथा‎ दिवस उजाडला आहे. परंतु‎ अद्यापही प्रशासनाने त्यांच्या‎ उपोषणाची दखल घेतली नाही.‎

बातम्या आणखी आहेत...