आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाराजीचा सुर:दर्जेदार रस्त्यासाठी दोन दिवसांपासून कार्यकर्त्यांचे उपोषण सुरुच

बिबी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दर्जेदार रस्त्यांबाबत लेखी निवेदने देवून सुद्धा दखल न घेतल्यामुळे येथील सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर उगलमुगले यांनी ५ डिसेंबरपासून उपोषणास सुरुवात केली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस उजाडला आहे. परंतु प्रशासनाने अद्यापही त्यांच्या उपोषणाची दखल घेतली नाही. त्यामुळे सर्वत्र नाराजीचा सुर उमटत आहे.

जालना मेहकर महामार्गावररील पिंप्री खंदारे येथून लोणार सरोवर या पर्यटनस्थळाला जोडणाऱ्या आखूड पल्ल्याच्या रस्त्याचे काम विहित मुल्यांकनाप्रमाणे न झाल्याने येथील सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर उगलमुगले यांनी संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली होती. हे काम मुल्यांकना प्रमाणे करण्यात यावे, अशी मागणी केली होती. परंतु अधिकाऱ्यांनी त्यांच्या निवेदनाची दखल न घेतल्यामुळे त्यांनी सोमवारपासून उपोषण सुरु केले आहे. रस्ता करणाऱ्या ठेकेदाराचा परवाना रद्द करून त्यास पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांस बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...