आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामगार:आठवडाभरापासून कामगारांचे उपोषण अद्यापही सुरूच ; प्रशासनाकडुन दखल नाही

बुलडाणा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर पालिकेत कामावर रुजू करून घेण्यात यावे, या मागणीसाठी मेहकर शहरातील रहेमतनगर येथील राम चिंधाजी नेमाडे व नंदलाल नेमाडे या कामगारांनी १२ ऑगस्ट पासून भर पावसात येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास सुरूवात केली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस उजाडला आहे. परंतु अद्यापही प्रशासनाने त्यांच्या उपोषणाची दखल घेतली नाही.

त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, १९८६ ते २०१० पर्यंत मेहकर नगर परीक्षेत कामगार म्हणून कामाला होताे. दरम्यानच्या काळात कामगारांनी अनेक मृतदेहांची विल्हेवाट लावली आहे. त्यावेळी पालिका प्रशासनाने पुन्हा कामावर घेण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. परंतु आश्वासन देवुन दहा ते बारा वर्षांचा कालावधी उलटून गेला असताना देखील पालिका प्रशासनाने कामावर रुजू करून घेतले नाही. त्यामुळे कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे.

कामावर रुजू करून घेण्यासाठी पालिका कार्यालयात अनेक वेळा अर्ज केले आहेत. परंतु या अर्जाला केराची टोपली दाखवण्यात आली आहे. कामगारांची हेळसांड थांबवण्यासाठी कामगारांना कामावर रुजू करून घेण्यात यावे, या मागणीसाठी मेहकर शहरातील रहेमतनगर येथील राम चिंधाजी नेमाडे व नंदलाल नेमाडे या कामगारांनी १२ ऑगस्ट पासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास सुरूवात केली आहे.

बातम्या आणखी आहेत...