आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाकडी गणपती:मानाच्या लाकडी गणपती मंदिरात श्रींची स्थापना

खामगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अय्याची कोठी स्थित पुरातन मानाच्या श्री लाकडी गणपती मंदिरात गणेश चतुर्थीनिमित्त ३१ ऑगष्ट रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास विसर्जनाची मुर्ती आणून ब्रह्मवृंदांच्या हस्ते विधिवत पूजा अर्चा करुन गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली. यावेळी मानाच्या लाकडी गणपती मंदिराचे संजय गिरजापुरे, अमित गोयनका, अजय अग्रवाल, अभिषेक अग्रवाल, संजय झुनझुनवाला, जगदेव गोडाळे, बावस्कर गुरुजी यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व भाविक उपस्थित होते.गणेश चतुर्थी निमित्त माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी सुध्दा मानाच्या लाकडी गणपती मंदिरात जावुन विघ्नहर्ता गणरायाची पुजा अर्चा करुन दर्शन घेतले.

यावेळी त्यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष राणा अशोकसिंह सानंदा, माजी नगराध्यक्षा अलकादेवी सानंदा, विजयादेवी सानंदा, माजी नगरसेवक किशोरअप्पा भोसले हे उपस्थित होते. यावेळी माजी आमदार सानंदा म्हणाले की, मानाचा लाकडी गणपती हा खामगावकरांचे आराध्य दैवत असुन नवसाला पावणारा देव म्हणून या गणपतीची सर्वत्र ख्याती आहे. लाकडी गणपतीशी अनेक भाविकांच्या धार्मिक भावना जुळलेल्या आहेत.

मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड.आर.बी.अग्रवाल व त्यांच्या सहकार्यांनी लाकडी गणपती मंदिराचा जिर्णोध्दार केला. मानाचा लाकडी गणपती हा रजत नगरीचे वैभव असुन या मंदिरामध्ये दर्शनासाठी येणार्या भाविकांचा मनोकामना पुर्ण होत असतात. श्री गणराया म्हणजे ज्ञान आणि बुद्धीची देवता, मांगल्य देवता आणि बुध्दी देवतेचा उत्सव म्हणजेच गणेशोत्सव असुन या उत्सवाला ऐतिहासिक परंपरा आहे. गणेशोत्सवात सर्वत्र सुख,शांती आणि समृध्दी नांदावी, शहरात सदैव सलोखा कायम राहावा, अशी प्रार्थना करुन गणेश मंडळांनी पर्यावरणपूरक व ध्वनी प्रदूषणमुक्त गणेशोत्सव साजरा करुन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...