आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेंडवळच्या घटमांडणीतील भाकीत:राजा कायम राहील, राज्यात पीक परिस्थितीसह पाऊसही सर्वसाधारण असेल, रोगराई नसणार

जळगाव जामोद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव जामोद येथे घटमांडणीच्या माध्यमातून भविष्यवाणी करताना गावकरी. - Divya Marathi
जळगाव जामोद येथे घटमांडणीच्या माध्यमातून भविष्यवाणी करताना गावकरी.

घटमांडणीच्या भाकितानुसार राजा कायम राहणार असून संरक्षणही चांगले राहणार आहे. पीक परिस्थिती व पाऊसही सर्वसाधारण राहणार आहे. यंदा राज्यात-देशात रोगराईही नसेल, असे भाकीत करण्यात आले. पीकपरिस्थिती, पाऊसपाणी त्याचबरोबर सामाजिक-आर्थिक आणि राजकीय परिस्थितीचा अंदाज सांगणाऱ्या व महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या जळगाव जामोद (जि. बुलडाणा) तालुक्यातील भेंडवळ येथील घटमांडणीच्या माध्यमातून होणारी भविष्यवाणी बुधवारी करण्यात आली.पीकपाण्याचा अंदाज व्यक्त करताना ते म्हणाले की, यंदा कापूस, उडीद, ज्वारी, हरभरा ही पिके चांगली येतील व भावही चांगला मिळेल. वाटाणा, बाजरी, गहू, करडई ही पिके मध्यम स्वरूपात येतील. देशात पीक चांगले येईल, मात्र पिकांना भाव मिळणार नाही. राजकीय भाकिताबाबत ते म्हणाले की, राजा कायम असणार म्हणजे देशात सत्तापालट होणार नाही. देशाचे संरक्षण चांगले राहील, परंतु देश आर्थिक अडचणीत असेल. पावसाळ्यात जून महिन्यात कमी पाऊस, जुलै महिन्यात साधारण पाऊस, तर ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस होईल. अवकाळी पाऊस वर्षभर राहिल. गत वर्षीप्रमाणे देशात व राज्यात आलेली रोगराई या वर्षी नसेल.

बातम्या आणखी आहेत...