आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:शेतकऱ्यांचा शेतमाल जादा भावाचे आमिष; चिखली येथील पवित्रा ट्रेडींग कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक

बुलडाणा2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चिखली येथील पवित्रा ट्रेडींग कंपनीने शेतमालाला जादा भावाचे आमिष देवून खरेदी केलेल्या शेतमालाची रक्कम अदा न करता शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक केली आहे. अशी तक्रार चिखली पोलिस ठाण्यात चिखली शहरातील सरस्वती नगर येथील सुनील लक्ष्मण मोडेकर यांनी दिली आहे.

त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी संतोष बाबुराव रनमोडे रा. पवित्रा ट्रेडर्स, चिखली, अशोक समाधान म्हस्के गांगलगाव ता. चिखली, नीलेश आत्माराम सावळे रा. गांगलगाव ता. चिखली यांनी पवित्रा ट्रेडींग कंपनी चिखली येथे तूर, चना, सोयाबीन असा ३ कोटी ४१ लक्ष ४२ हजार ५०४ रूपयांचा शेतमाल घेवून आर्थिक फसवणूक केली आहे. तसेच आजपावेतो १६१ शेतकऱ्यांचा ही त्यांनी विश्वासघात करून आर्थिक फसवणूक केली आहे.

या तक्रारीवरून चिखली पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलिस अधीक्षक श्रवण दत्त, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम व ठाणेदार अनिल बेहरानी यांच्या मार्गदर्शनाखाली बुलडाणा येथील आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक अशोक जायभाये हे करत आहेत. तरी उपरोक्त आरोपींकडून जिल्ह्यातील व आजूबाजूच्या तालुक्यातील शेतकऱ्यांचा शेतमाल जादा भावाचे आमिष दाखवून पवित्रा ट्रेंडीग कंपनीने खरेदी केलेल्या शेतमालाची रक्कम अदा न करता फसवणूक केली असल्यास त्या शेतकऱ्यांनी त्यांचे जवळ उपलब्ध असलेल्या कागदपत्रांसह आर्थिक गुन्हे शाखा, बुलडाणा येथे हजर राहून आपला जबाब नोंदवावा, असे आवाहन ठाणेदार अनिल बेहरानी यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...