आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तंबाखुक्तीचे विविध‎ संदेश:आपट्याच्या पानाद्वारे‎ व्यसन मुक्तीचा संदेश‎

वाशीम‎ ‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तंबाखूचे व्यसन शरीरासाठी अत्यंत‎ घातक आहे. तंबाखू खाणे म्हणजे‎ जीवनाचा खेळ खल्लास करणे‎ होय. तंबाखूसारख्या घातक‎ व्यसनापासून विद्यार्थी व तरुणांना‎ रोखण्यासाठी शासनाच्या राष्ट्रीय‎ तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत‎ जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विजय‎ काळबांडे, श्री बाकलीवाल‎ विद्यालय व एनसीसी च्या संयुक्त‎ विद्यमाने मंगळवारी आयोजित‎ ‘तंबाखूजन्य पदार्थाचे दुष्परिणाम’‎ या विषयावर आयोजित स्पर्धेत ६०‎ विद्यार्थ्यांनी आपट्याच्या पानाच्या‎ प्रतिकृतींवर तंबाखुक्तीचे विविध‎ संदेश लिहून इतरांना व्यसन‎ मुक्तीचा संदेश दिला.‎

या स्पर्धेसाठी ११ महाराष्ट्र बटालियन‎ अकोल्याचे कमांडिंग ऑफिसर‎ कर्नल बिजॉय चौधरी, लेफ्टनंट‎ कर्नल चंद्रा प्रकाश भदोला यांच्या‎ मार्गदर्शनात एनसीसी अधिकारी‎ अमोल काळे यांनी पुढाकार घेतला.‎ विजयादशमीचे औचित्य साधून‎ बाकलीवाल शाळेत झालेल्या‎ कार्यक्रमात स्पर्धेत सहभागी‎ विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम‎ मान्यवरांच्या उपस्थितीत घेण्यात‎ आला. कार्यक्रमाला राष्ट्रीय तंबाखू‎ नियंत्रण कार्यक्रम अधिकारी डॉ.‎ आदित्य पांढारकर, रामकृष्ण धाडवे,‎ पर्यवेक्षिका भोंडे यांची प्रमुख‎ उपस्थिती होती.‎

बातम्या आणखी आहेत...