आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:मुलाला किडनी देवून आईने दिले नवजीवन‎ ; पिंपळगाव येथील मातेचा करण्यात आला सन्मान‎

खामगाव‎20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील काही दिवसांपासून किडनी‎ आजाराने ग्रस्त असलेल्या‎ आपल्या चिमुकल्या मुलास‎ स्वतःची किडनी देवून आईने‎ पोटच्या गोळ्यास नवजीवन दिले‎ आहे. त्यामुळे या मातेचा किडनी‎ दिनानिमित्त सन्मान करण्यात‎ आला आहे.‎ तालुक्यातील पिंपळगाव राजा‎ येथील रहिवासी असलेल्या पवन‎ अशोक बोदडे या मुलास मागील‎ काही दिवसांपासून किडनीच्या‎ आजाराने ग्रासून टाकले होते.‎ बालपणात हसत खेळत आयुष्य‎ जगताना भयग्रस्त आजाराने या‎ मुलाचे जगणे कठीण झाले होते.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ परंतु त्याच्या आयुष्याला पुन्हा‎ एकदा नवजीवन देण्यासाठी‎ त्याच्या कुटुंबाने अनेक‎ दवाखान्याचे उंबरठे झिजवत‎ हजारो रुपये खर्च केले. परंतु‎ त्याचा काहीच फायदा झाला नाही.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ किडनी निकामी झाल्याने त्याला‎ किडनीची आवश्यकता होती.‎ अनेक ठिकाणी आयुर्वेदिक,‎ होमिओपॅथी, ॲलोपॅथी यासह‎ अनेक औषधोपचार केले.

परंतु‎ किडनी निकामी झाल्याने उपचारांत‎ काहीच बदल झाला नाही. त्यामुळे‎ बोदडे कुटुंबासमोर मोठे संकट‎ निर्माण झाले होते. अशातच‎ स्वताच्या आयुष्याचा विचार न‎ करता मुलाची आई संगीता अशोक‎ बोदडे यांनी स्वतःची किडनी‎ मुलाला देण्याचे ठरवले. छत्रपती‎ संभाजी नगर येथील डॉक्टरांच्या‎ अथक परिश्रमातून मुलाच्या‎ आईची किडनी काढून तिचे‎ मुलाच्या शरीरात प्रत्यारोपण केले.‎ त्यामुळे मायेच्या ममतेला पाझर‎ फुटून पोटच्या गोळ्याला नवजीवन‎ देण्यासाठी या मातेने कुठलाही‎ विचार न करता महत्वपूर्ण भूमिका‎ बजावली. आज पवन बोदडे व‎ आई संगीता बोदडे यांची प्रकृती‎ ठणठणीत आहे. पोटच्या मुलाला‎ जीवनदान देवून या मातेने‎ इतरांसमोर एक आदर्श निर्माण‎ केला आहे.

जागतिक किडनी‎ दिनानिमित्त आयोजित किडनी‎ दाता सत्कार सोहळ्यात मंत्री‎ अतुल सावे, माजी मंत्री राजेश‎ टोपे, खा. इम्तियाज जलील यांच्या‎ उपस्थितीत किडनी दाता संगीता‎ अशोक बोदडे यांचा प्रशस्तीपत्र‎ देऊन यथोचित सन्मान करण्यात‎ आला. यावेळी डॉ.आशिष‎ देशपांडे, डॉ.वीरेंद्र वडगावकर,‎ डॉ.प्रवीण सुर्यवंशी, डॉ.हिमांशू‎ गुप्ता, डॉ. शोएब हाशमी,‎ डॉ.निरंजन जोशी, डॉ. नताशा‎ वर्मा, डॉ. मिलिंद वैष्णव, पवन‎ बोदडे, अनुराधा बोदडे यांची‎ उपस्थिती होती.‎

बातम्या आणखी आहेत...