आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेवानिवृत्त:संतांचे विचार आचरणात‎ आणण्याची गरज‎

किनगावराजा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजच्या युगामध्ये संताचे विचार‎ आचरण्यात आणण्याची नितांत‎ गरज असल्याचे प्रतिपादन‎ सेवानिवृत्त उच्च श्रेणी मुख्याध्यापक‎ शिवाजीराव काळुसे यांनी केले.‎ येथे संत शिरोमणी रोहिदास‎ महाराज यांच्या जयंतीनिमित्त‎ आयोजित कार्यक्रमात ते बोलत‎ होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की,‎ गुरु रोहिदासांच्या विचारधारेत मनुष्य‎ हाच धर्माचा केंद्र बिंदू होता. मानवी‎ मनाला सुयोग्य विचार करण्याची‎ दिशा लावणे हेच सर्व सुखाचे‎ उगमस्थान असल्याची धारणा‎ रोहिदास महाराज यांची असल्याचे‎ त्यांनी सांगीतले कार्यक्रमाला प्रमुख‎ पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सदस्या‎ विद्याताई दीपक साळवे,‎ शिवाजीराव काळुसे, प्रतिभाराजे‎ जाधव, दीपक पडुळकर, सखाराम‎ हरकळ, रामेश्वर भानुसे उपस्थित‎ होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक‎ मधुकर साळवे यांनी केले.या‎ कार्यक्रमांमध्ये विविध मान्यवरांनी‎ मार्गदर्शन केले. यावेळी सामाजिक‎ कार्यकर्ते दीपक साळवे, माजी‎ तंटामुक्त अध्यक्ष विजय साळवे,‎ दिनेश पारखे, गजानन शिंगणे,‎ माधव शिंगणे, सुनील शिंगणे,‎ दशरथ शिंगणे, भूषण शिंगणे, सुरेश‎ शिंगणे, अशोक शिंगणे, तोताराम‎ शिंगणे, पवन शिंगणे, कारभारी‎ शिंगणे, वसंत साळवे, ज्योती‎ साळवे, माधुरी शिंगणे, गीता डोंगरे,‎ लक्ष्मी पारखे, पूजा कुटे, विठ्ठल‎ कायदे, चांगुणा साबळे, सुंदराबाई‎ शिंगणे, मंगला शिंगणे, रमा शिंगणे‎ यांच्यासह महिला व नागरिक‎ मोठ्या संख्येने उपस्थित होते.‎ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छगनलाल‎ शिंगणे यांनी तर आभार प्रदर्शन भरत‎ शिंगणे यांनी केले.‎

बातम्या आणखी आहेत...