आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आश्वासन:वृत्तपत्र विक्रेत्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करेल; माजी अर्थमंत्री मुनगंटीवार यांचे आश्वासन

शेगाव19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सत्ता असो किंवा नसो मी कायमच वृत्तपत्र विक्रेत्यांच्या समस्या सोडवण्यासाठी संसदीय आयुधांचा वापर करून तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करेल, असे आश्वासन राज्याचे माजी अर्थमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन १ व २ मे रोजी चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आले होते. अधिवेशनाच्या उद्घाटन सोहळ्याला महाराष्ट्र टाइम्सचे संपादक श्रीपाद अपराजित, विधान मंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष व आमदार माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपचे डॉ. मंगेश गुलवाडे, रामपाल सिंह चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशनचे ॲड. सुरेश तालेवार, वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे कार्याध्यक्ष सुनील पाटणकर, सरचिटणीस बालाजी पवार, कोशाध्यक्ष गोरख भिलारे, शिवगोंडा खोत, विनोद पन्नासे, प्रशांत विघ्नेश्वर, संजय बद्दलवार, राजेश सोलापन, राज्य कार्यकारिणी सदस्य प्रकाश पाटील उन्हाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, मी राज्याचा अर्थमंत्री असताना आमच्या सरकारने पत्रकारांच्या वृत्तपत्र विक्रेत्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. सत्ता असताना ७ मार्च रोजी वृत्तपत्र विक्रेत्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी आम्ही समिती गठीत केली होती. त्या समितीचा अहवाल विद्यमान शासनाला सादर करण्यात आला आहे.

या अहवालातील शिफारशींची अंमलबजावणी व्हावी, यासाठी विधानसभेमध्ये संसदीय आयुधांचा वापर करून निर्णय घेण्यास सरकारला भाग पाडू, असेही आमदार मुनगंटीवार यावेळी म्हणाले. सत्ता असो किंवा नसो मी कायमच तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करेल, असेही आश्वासन दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोद पन्नासे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...