आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारभार चव्हाट्यावर:नळ कनेक्शन नसतानाही बजावण्यात आली नोटीस

मोताळा11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोणत्याही प्रकारचे अवैध नळ कनेक्शन नसतांना शहरातील एका व्यक्तीला नळ वैध करून अनामत रक्कम भरण्याची नोटीस नगर पंचायतकडून देण्याचा प्रकार १ जुलैला घडला असून ही नोटीस रद्द करण्याची मागणी तक्रार अर्जातून नगर पंचायतचे मुख्याधिकाऱ्यांना ३ ऑगस्टला करण्यात आली. या तक्रारीमुळे मोताळा नगर पंचायतचा कारभार चव्हाट्यावर आल्याचे दिसून येत आहे.

शहरातील प्रभाग क्र. ११ मधील सरदार शाह सुलेमान शाह यांनी कोणत्याही प्रकारचे नळ कनेक्शन घेतलेले नाही. तरीही अवैध नळ कनेक्शन वैध करून पुढील सात दिवसाच्या आत अनामत रकमेचा भरणा करण्याची नगर पंचायतकडून त्यांना नोटीस पाठविण्यात आली. ही नोटीस घेऊन आलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांना उद्धटपणाची वागणूक देत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याची पोलीस स्टेशनला खोटी तक्रार देण्याची धमकी देण्यात आली असल्याचे त्यांनी तक्रार अर्जात नमूद केले आहे.

शाह यांनी कोणत्याही प्रकारचे अवैध नळ कनेक्शन घेतले नसताना त्यांना नोटीस का बजावण्यात आली तसेच त्यांनी हे पैसे का भरावे, असा प्रश्न तक्रार अर्जात उपस्थित करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी व दिलेली नोटीस रद्द करण्यात यावी, अशी मागणी सरदार शाह यांच्या वतीने नगर पंचायत प्रशासनास करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...