आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबँकेच्या संक्रमणाच्या काळात अधिकारी व कर्माचाऱ्यांनी रात्रीचा दिवस व रक्ताचे पाणी करून बँकेला पुनर्वैभव प्राप्त करून दिले. माझ्या दहा वर्षाच्या अध्यक्षीय कार्यकाळात आपण सर्वांनी जी मेहनत घेतली, त्यामुळे आपण बँकेची प्रगती करू शकलो, असे प्रतिपादन बँकेचे अध्यक्ष आशिष चौबीसा यांनी केले. येथील खामगाव अर्बन बँकेच्या कर्मचारी संघटनेचे द्विवार्षिक दोन दिवसीय संमेलन आयोजित केले होते. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. याप्रसंगी बँकेच्या ३२ शाखेतील कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.
यावेळी संमेलनाचे उद्घाटक म्हणून रा. स्व. संघाचे जिल्हा संघचालक बाळासाहेब काळे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून गजानन गटलेवार नागपूर, आ. अॅड. आकाश फुंडकर, रवी सहस्त्रबुद्धे, नागपूर कार्याध्यक्ष, सुधीर कुळकर्णी, महादेव भोजने सचिव जे. व्ही. मेहता हायस्कुल, चंद्रकांत जोशी, गिरीश देशपांडे, कृपालसिंग पवार यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात भारत माता व दत्तोपंत ठेंगडी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. प्रास्ताविक संघटनेचे सचिव संजीव राऊत यांनी केले. त्यानंतर जिल्हा संघचालक बाळासाहेब काळे, महादेवराव भोजने, अॅड. आकाश फुंडकर, रवी सहस्त्रबुद्धे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर कुळकर्णी यांनी आपले विचार व्यक्त केले. चौबीसा म्हणाले, की संचालक मंडळाने मागील दहा वर्षात कर्मचारी वर्गासाठी मनापासून सहानुभूतीपूर्वक विचार करून, जास्तीत जास्त कर्मचारी वर्गाच्या हितांचे निर्णय घेतले आहेत.
त्यामध्ये वेतन वाढ असो की, गृह कर्जाची मर्यादा व माफक व्याजदर, अगदी कर्मचारी वर्गाच्या आरोग्याची काळजी असो, बढती प्रक्रिया असो, आपण सर्वांचे कौतुकही करण्यात संकोच केला नाही. बँकेची प्रगती हेच ध्येय डोळ्यापुढे ठेवून प्रगतीची वाटचाल कायम राहील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दुसऱ्या सत्रात बँकेचे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर भारतीय मजदूर संघाचे विदर्भ प्रदेश महामंत्री गजानन गटलेवार यांनी भारतीय मजदूर संघाच्या कार्यानिमित्त अनेक संघटना व संचालक मंडळ पाहिले. परंतु त्यांच्यामध्ये एवढा एकोपा बघावयास मिळाला नाही. बँकेच्या अध्यक्षांनी आपल्या भाषणातून कर्मचारी हिताचे निर्णय तसेच कर्मचारी वर्गाचे कौतुक आतापर्यंत कुठेही ऐकावयास मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले. सचिव प्रमोद कस्तुरे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी प्रमोद कस्तुरे व त्यांचे सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
बँकेची नूतन कार्यकारिणी जाहीर गटलेवार यांनी नूतन कार्यकारिणी जाहीर केली. त्यामध्ये अध्यक्षपदी पराग देशमुख, तर कार्याध्यक्षपदी अजय सराफ यांची, सचिवपदी प्रमोद कस्तुरे यांची निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्षपदी राजू जुनारे, राकेश शर्मा, प्रदीप चोंदे, सुधीर कुळकर्णी, महिला प्रतिनिधी प्रीतिका बोंडे, संघटक म्हणून अभय सावदेकर बुलडाणा विभाग व दीपक बांबल यांची अमरावती विभाग म्हणून निवड केली. तर सदस्य सल्लागार म्हणून अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जंबो कार्यकारिणीला मान्यता देण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.