आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बुलडाणा:दुधा येथील पेनटाकळीचा कॅनॉल फुटला, शेतात पाणी घुसल्याने मोठे नुकसान

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बुलडाणा जिल्ह्यातील मेहेकर तालुक्यातील पेनटाकळी प्रकल्पाचा कॅनॉल फुटल्याची घटना आज घडली आहे. यामुळे कॅनॉलचे पाणी आसपासच्या शेतात घुसून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

पेनटाकळी प्रकल्प तयार झाल्यानंतर पेनटाकळी कॅनॉलचे काम 1996 च्या दशकात पूर्ण झाले होते. हा कॅनॉल झाल्यापासून तो सतत वादग्रस्त ठरत आला आहे. पेनटाकळी धरणाचा हा कॅनॉल पेनटाकळी, दुधा, रायपूर ,सावञा,जानेफळ, गोमेधर येथील शेतकरी बांधवांच्या शेतातून जातो. दरम्यान, या कॅनॉलला 14 रोजी पाणी सोडण्यात आले होते. तो कॅनॉल आज फुटल्यामुळे दुधा येथील गजानन अवचार परसराम अवचार या शेतकरी बांधवांचे अतोनात नुकसान झाले आहे. तर, रायपूर येथील शेतकरी मनोहर काळे यांच्या शेतातील कॅनॉलच्या भिंतीला तडे गेले असून त्यातून मोठे नळ लागावेत असे पाणी पाझरताना दिसत आहे.

या कॅनॉलच्या 1 ते 11 किमीचे काम अतिशय निकृष्ठ दर्जाचे झाले असून या जमीनी सतत पाझरत असल्यामूळे शेतकरी बांधवांचे सतत नुकसान होत असते. कॅनॉलच्या भिंतीवर मोठ-मोठी झाडे वाढली आहेत. साफसफाई न करताच पाणी सोडल्यामुळे कॅनॉलच्या भिंतीतून पाणी पाझरत आहे. अनेक वेळा यासाठी आंदोलने ,उपोषण करण्यात आली असून 1 ते 11 किमीपर्यंतची पाईपलाईन नीट करण्याची मागणी जोर धरत आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser