आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविजेचे साहित्य चोरट्यास पोलिसांनी अवघ्या सतरा तासात जेरबंद केले. आरोपीकडून वाहनासह वीज साहित्य असा ४ लाख ४८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई गुरुवारी करण्यात आली.
गेल्या काही महिन्यांपासून महावितरणच्या पोलवरील इलेक्ट्रिक अॅल्युमिनियम तार चोरीचे सत्र सुरु होते. काही दिवसांपूर्वी सहायक अभियंता श्रीकांत अरुण सोयस्कार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नांदुरा ते जळगाव जामोद रोड लगत येरळी शिवारातील ३३ केव्ही पोलवरील ९६ हजार रुपये किंमतीची चार हजार मीटर लांबीची अल्युमिनिअमची तार चोरीस गेली आहे. या तक्रारीवरुन पोलिसात गुन्हा दाखल करून तपास पोहेकॉ गजानन जायभाये यांच्याकडे देण्यात आला. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून अवघ्या सतरा तासात आरोपी मो. नकीम उजर अब्दुल हकीम (२२) रा. पातूर जि.अकोला यास ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.