आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेरबंद:दुचाकी चोरट्यास पोलिसांनी केले जेरबंद

बुलडाणा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंदखेडराजा तालुक्यातील सावखेड तेजन फाटा येथे काल शुक्रवारी रात्रीचे सुमारास स्थागुशाचे पथक पेट्रोलिंग व संशयित वाहनाची तपासणी करीत असताना एका चोरट्यास दुचाकीसह जेरबंद केले आहे. प्रकरणी पोलिसांनी आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करून ४२ हजार रुपये किमतीची दुचाकी जप्त केली आहे. ही कारवाई काल शुक्रवारी रात्रीचे सुमारास करण्यात आली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे काल रात्री सावखेड तेजन फाटा येथे नाकाबंदी करून संशयित वाहनाची तपासणी करीत असतांना एम.एच. २१/ ए जी/ ७०६६ या क्रमांकाचे वाहन संशयास्पदरीत्या मिळून आले. यावेळी पोलिसांनी आरोपी वाहन चालक शेख जावेद शेख अहमद वय ३८ रा. जाम नाका परभणी याच्याकडे वाहनाच्या कागदपत्रांची मागणी केली असता त्याच्याकडे कुठलेच कागदपत्रे आढळून आली नाही. त्यानंतर पथकाने सिंदखेडराजा पोलिसांकडे विचारणा केली असता सदर वाहन चोरीचे असल्याचे त्यांना समजले. त्यानंतर पोलिसांनी ४२ हजार रुपये किंमतीची दुचाकी जप्त करून वाहन चालक शेख जावेद याच्या विरुध्द गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक सारंग आवाड, अपर पोलिस अधीक्षक महामुनी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...