आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा गाडीला ओव्हरटेक करणाऱ्या दुचाकीमुळे पायाला लागल्यामुळे गाडी पाहुन चालवायचा सल्ला देणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यास लोखंडी रॉडने मारहाण करणे एकास चांगलेच भोवले. शुभम वाघुर्डे नावाच्या या दुचाकी चालकास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्नील च खटी यांनी चार वर्ष सश्रम कारावास व तीन हजार पाचशे रुपये दंडाची शिक्षा आज सुनावली. सोबतच विविध कलमान्वये देखील दोषी ठरवून सर्व शिक्षा एकत्रितपणे भोगण्यास सांगितले. बुलडाणा येथे २०१८ मध्ये पोलिस हेड कॉन्स्टेबल या पदावर असताना राधेश्याम वैष्णव हे १८ मे २०१८ रोजी धाड येथे त्यांच्या वैयक्तीक कामाकरिता मोटारसायकलने जात होते. त्यावेळी डॉ. मालवे यांच्या दवाखान्याजवळ मोटार सायकलवर असलेल्या शुभम वाघुर्डे व त्याच्या सोबतच्या अल्पवयीन मुलाने त्यांच्या गाडीचा धक्का ओव्हरटेक करताना वैष्णव यांच्या गाडीला दिल्याने त्यांच्या उजव्या पायाला लागले होते.
त्यामुळे त्यांनी शुभम यास समजावले असता त्याने अरेरावीवर येवून शिविगाळ व दमदाटी केली व धाड येथील मुख्य बाजार गल्लीत सुभाष किराणा दुकानाजवळ राधेश्याम वैष्णव यांना लोखंडी रॉडने डोक्याला मारहाण केली. या प्रकरणात फिर्यादी पक्षातर्फे फिर्यादी राधेश्याम गोविंददास वैष्णव, पंच संतोष अहेर, वैद्यकीय अधिकारी डॉ. भागवत भुसारी, धाड येथील कार्यरत वैद्यकीय अधिकारी विवेक सोळंकी, तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक संग्राम पाटील या साक्षीदारांच्या साक्षी तपासल्या त्या महत्वपूर्ण ठरल्या. सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील अॅड. सोनाली सावजी देशपांडे यांनी न्यायालयासमोर बाजू मांडली.
त्यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून वि. न्यायालयाने आरोपीला चार वर्ष सश्रम करावास व रू.२००० दंड, दंड न भरल्यास पाच महिने कारावास, कलम २९४ अन्वये दोन महिने कारावास व ५०० रुपये दंड, दंड न भरल्यास पंधरा दिवसांची कैद, कलम ५०४ व ५०६ अंतर्गत एक वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकी ५०० रूपये दंड तसेच दंड न भरल्यास प्रत्येकी प्रत्येकी दोन महिने कारावास अशा प्रकाराची शिक्षा आज रोजी सुनावली व सर्व शिक्षा एकत्रितपणे भोगण्यास सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.