आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दैनिक दिव्य मराठी इम्पँक्ट:पालखी मार्गावरील खड्डे बुजवले

जानेफळ6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्य रस्त्यावरील खड्डे जैसे थे, विकास कामे करण्यात ग्रामपंचायत उदासिन या मथळ्याखाली दैनिक दिव्य मराठीने १८ जुलैच्या अंकात सविस्तर वृत्त प्रकाशीत करून ग्रामपंचायत प्रशासनामध्ये एकच खळबळ उडवून दिली होती. या वृत्ताची दखल घेत ग्रामपंचायत प्रशासनाने रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास काल रात्रीपासून सुरूवात केली आहे. उशिरा का होईना खड्डे बुजवल्यामुळे वाहन धारकांसह ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास सोडला.

गावात येत्या ३० जुलै रोजी श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे आगमन होणार आहे. परंतु त्यापूर्वीच येथील ग्रामपंचायत प्रशासनाने एका खासगी कंपनीला पालखी मार्ग खोदण्याची परवानगी दिली होती. त्यामुळे या कंपनीने पालखी मार्गावर जागोजागी खोदकाम केले होते. परंतु या खोदकामामुळे पडलेले खड्डे बुजवण्यात आले नाहीत. या खड्डयाचा सर्वाधिक त्रास वाहन धारकांसह विद्यार्थी व गामस्थांना सहन करावा लागला होता. या बाबत दैनिक दिव्य मराठीने मुख्य रस्त्यावरील खड्डे जैसे थे, विकास कामे करण्यात ग्रामपंचायत उदासिन या मथळ्याखाली वृत्त प्रकाशीत केले होते. या वृत्ताची दखल घेत ग्रामपंचायत प्रशासनाने काल २२ जुलैच्या रात्री पासुन खड्डे बुजवण्यास सुरूवात केली आहे. उशिरा का होईना पालखी मार्गावरील खड्डे बुजवण्यात आल्यामुळे वाहन धारकांसह ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी आवाज उठवत असल्याबद्दल ग्रामस्थांनी दैनिक दिव्य मराठीचे आभार व्यक्त केले आहेत.

बातम्या आणखी आहेत...