आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणकारांचे मत:सोयाबीनच्या भावात तेजी‎

चिखली‎21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाजारात सोयाबीनची आवक सध्या‎ वाढली आहे. तर दुसरीकडे‎ सोयाबीनमधील ओलावा आता‎ कमी येत आहे. मात्र आंतरराष्ट्रीय‎ बाजारात दर वाढलेले असतानाही‎ देशातील दर काहीसे कमीच आहेत.‎ परंतु आता केंद्र सरकारने खाद्यतेल‎ आणि तेलबियांवरील स्टॉक लिमिट‎ २ नोव्हेंबर रोजी एक पत्र जारी‎ करून काढल्याने सोयाबीन‎ बाजाराला आधार मिळणार असून‎ सोयाबीनच्या भावात तेजी येणारे‎ असल्याचे जाणकारांचे मत आहे.‎

देशात खाद्यतेलाच्या दरात मोठी‎ वाढ झाल्यानंतर केंद्र सरकारने ८‎ ऑक्टोबर मध्ये स्टॉक लिमिट‎ लावुन राज्यांना स्टॉक लिमिट‎ ठरविण्याचे अधिकार दिले होते.‎ मात्र अनेक राज्यांनी त्याची‎ अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे‎ केंद्राने लिमिट ठरवून ३० जून आणि‎ नंतर ३१ डिसेंबर पर्यंत स्टॉक लिमिट‎ लावले होते.मात्र या स्टॉक लिमिट‎ मुळे मोठी किरकोळ विक्री साखळी‎ आणि घाऊक व्यापाऱ्यांना व्यवहार‎ करणे अवघड होत आहे. तसेच‎ सध्याची स्टॉक लिमिट पद्धत २००८‎ मध्ये अमलात आलेली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...