आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षा पे चर्चा:‘परीक्षा पे चर्चा’ अंतर्गत पंतप्रधानांनी साधला संवाद; समर्थ कृषी महाविद्यालय येथे परीक्षा पे चर्चा

देऊळगावराजा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

समर्थ कृषी महाविद्यालय येथे परीक्षा पे चर्चा २०२२ चे थेट प्रक्षेपण विद्यार्थ्यांकरिता करण्यात आले होते, यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे स्वागत केले. हे धोरण भारत देशासाठी सर्व शिक्षक, विद्यार्थी तसेच नागरिकांनी मिळून तयार केले व याचा फायदा निश्चितच भविष्यासाठी होईल असे सांगितले. संपूर्ण देशामध्ये राबवत असलेली स्वच्छ भारत मोहिमेत बालक, विद्यार्थी व नागरिकांनी जो पुढाकार घेतला त्याबद्दल देखील त्यांनी कौतुक केले. जागतिक तापमान कमी करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थी व नागरिकाने पाण्याचा वापर जपून करावा तसेच वृक्षांचे संगोपन करण्याचे आवाहन केले. नमो ॲप्स मुळे विद्यार्थ्यांना बराच फायदा देखील होत असल्याचे सांगितले. अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नवीन दिशा, ऊर्जा व आत्मविश्वास प्राप्त होत असतो अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते.

या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण महाविद्यालयात प्रोजेक्टर द्वारे विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. थेट प्रक्षेपणाच्या आयोजनासाठी समर्थ कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य नितीन मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनात प्रा. मोहजीतसिंह राजपूत, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. शुभम काकड, सह कार्यक्रम अधिकारी प्रा. किरण ठाकरे, प्रा. अश्विनी जाधव, प्रा. लिकेश मेश्राम यांनी प्रयत्न केले.

बातम्या आणखी आहेत...