आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकालाचा परिणाम:जिल्ह्यातील ग्रा.पं.च्या निकालाचा परिणाम जि. प. व पं. स. वर होणार

लक्ष्मीकांत बगाडे | बुलडाणा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील २७९ ग्रामपंचायतींचा निकाल मंगळवारी जाहीर झाले. यात विजय मिळवल्याचे दावे-प्रतिदावे विविध राजकीय पक्षांकडून केले जात असले तरी प्रत्यक्ष सरपंच व ग्रामपंचायत सदस्य कोणत्या गटाचे, पक्षाचे आहेत हे कळणे कठीण आहे. कारण जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत हे सदस्य, सरपंच कोणत्या बाजूने निवडणुकीत सहभाग घेतील याची शाश्वती कोणी देऊ शकत नाही. मात्र महाविकास आघाडी एकत्रित लढल्यास याचा फायदा होईलच हे आजतरी सांगणे कठीण आहे. तर भाजप व शिंदे गटाचीही तीच स्थिती राहणार आहे. परंतु, या ग्रामपंचायतीमुळे किमान पंधरा जिल्हा परिषद सर्कल व ३० पंचायत समिती गणात राजकीय हालचाली वाढणार आहेत.

जिल्ह्यात ११०० हून अधिक गावे असून ग्रामपंचायतींची संख्याही ८०० हून अधिक आहे. यावेळी झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका या २७९ इतक्याच आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या ६० सर्कल व १२० पंचायत समिती गणांबाबत आजतरी काय होईल. हे सांगता येणे शक्य नाही. ग्रामपंचायती जशा कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. तशा जिल्हा परिषद व पंचायत समिती या सुद्धा गावपातळीवरील नेत्यांच्या निवडणुका आहेत. मोठे नेते शक्यतोवर ग्रामपंचायतींच्या निवडणुकांत सरळ हात घालत नाही.

मदत लागली तर तेवढी करण्याचा प्रयत्न करतात. ग्रामीण पातळीवरच या निवडणुकांचा कस लागत असतो. एकमेकांचे नातेवाईक एकमेकांविरुद्ध कुरघोडी करुन या निवडणुकीत दंड थोपटून उभे असतात. एकाच कुटुंबातील व्यक्ती एकमेकांच्या विरोधात लढतात. फरक एवढाच असतो की पक्षाची विचारसरणी वेगवेगळी असल्याने पुढे निवडून आल्यानंतर किंवा पडल्यानंतर दोघांचेही पक्ष बदलतात अन् जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये पक्षांच्या चिन्हावर निवडणुका लढवल्या जातात. ग्रामपंचायतींची निवडणूक ही जरी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचा ट्रेलर असला तरी खरा पिक्चर निवडणुका लागल्यानंतरच लक्षात येणार आहे.

जिल्ह्यात भाजप-शिंदे गटाचे वर्चस्व
राजकीय दृष्टया जिल्ह्यावर सध्या भाजप- शिंदे गटाचे वर्चस्व आहे. कारण खासदार हा शिंदे गटाचा असून त्यांच्या सोबत दोन आमदार आहेत. तर भाजपचे तीन आमदार आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक आमदार आहे. त्यामुळे भाजप व शिंदे गट जरी मोठा असला तरी जिल्हा परिषदेत आजवर काँग्रेसचेच वर्चस्व राहिले आहे. यावेळी महाविकास आघाडी सोबत असल्याने त्याचा फायदा काय होणार हे आजतरी सांगणे कठीण आहे.

ग्रामीण राजकारणात हालचाली वाढणार
जिल्ह्यात ११०० हून अधिक गावे असून ग्रामपंचायतींची संख्याही ८०० हून अधिक आहे. यावेळी झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका २७९ ठिकाणीच झाल्या. याचा परिणाम जिल्हा परिषदेच्या १५ गटात आणि पंचायत समितीच्या ३० गणात होणार आहे. उर्वरीत ग्राम पंचायतींच्या निवडणुकीनंतरच जिल्हा परिषदेच्या ६० सर्कल
व १२० पंचायत समिती गणांबाबत काय होईल याचे चित्र स्पष्ट होईल.

बातम्या आणखी आहेत...