आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीत तालुक्यातील १६ ग्रामपंचायतचे निकाल आज मंगळवारी घोषित करण्यात आले. यामध्ये १६ सरपंच तर सदस्य उमेदवार निवडून आले आहेत. या अगोदर ४३ उमेदवार अविरोध निवडून आले होते. तर ३ जागा रिक्त राहिल्या आहेत. आज २० डिसेंबर रोजी मतमोजणी करण्यात आली. तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी अतुल पाटोळे यांनी मतमोजणीसाठी चोख व्यवस्था केली होती. यावेळी निवडणूक नायब तहसीलदार गजानन बोरले, नायब तहसीलदार हेमंत पाटील यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. निवडणूक निकाल ऐकण्यासाठी तालुक्यातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी यांनी निवडणुक निकाल केंद्राला भेट दिली.
तर ठाणेदार प्रदीप त्रिभुवन यांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. खुटपुरी - दीक्षा नितीन गवळी, नांद्री वंदना शेषराव कांडेलकर, दिवठाणा- रेखा गोपाल हेलोडे, किन्ही महादेव - त्रिगुणा रामेश्वर वाघ, वझर - पौर्णिमा दिलीप भारसाकळे, माक्ता - शिल्पा गणेश ताठे, कवडगाव- सिंधू किसन राठोड, वडजी - अजाबराव दगडूजी वाघ, नागापूर- कैलास प्रल्हाद वासमकार, झोडगा - वंदना राम कटकवाळ, सजनपुरी- सय्यद मेहरूनिसा सय्यद अकबर, कोंटी - संजू राजाराम ठोंबरे, लोखंडा - दुर्गा श्रीकृष्ण ठाकरे, नायदेवी - वछलाबाई शालिग्राम तायडे, लोणी गुरव - अंबिका दिलीप भगत व जळका तेली सरपंच पदी दीपक वसंता चव्हाण हे निवडून आले आहेत. विजयाचा जल्लोष करताना कार्यकर्ते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.