आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतमोजणी:मलकापूरच्या उमाळी, आळंद, बेलाड ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर

मलकापूर3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील बेलाड, आनंद व उमाळी या ग्रामपंचायतींच्या मतदानाची प्रक्रिया ४ ऑगस्ट रोजी पार पडली. त्यानंतर आज ५ ऑगष्ट रोजी येथील तहसील कार्यालयात मतमोजणी होऊन निकाल घोषित करण्यात आले.बेलाड ग्रामपंचायतीच्या ९ सदस्यपदांसाठी झालेल्या या निवडणुकीत एक तर आळंद येथील सात सदस्यांपैकी ६ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. आळंद मध्ये एकाच जागेसाठी मतदान घेण्यात आले. त्यात अक्षय श्रीराम भगत १६६ मतांनी विजयी झाले. तसेच बेलाड ग्राम पंचायत वॉर्ड क्रमांक एक मधून सागर निनाजी सांबारे, दीपमाला देवानंद इंगळे, प्रिया विजय काटे, हे विजयी झाले आहेत.

तसेच वाॅर्ड क्र. दोन मधून संदीप शत्रुघ्न निबोळकर, इच्छाराम दिगंबर संभारे, दुर्गा सुनील सांबारे, वॉर्ड क्रमांक तीन मधुन सचिन संतोष सांबारे, प्रतिभा विनोद इंगळे, हे आठ उमेदवार विजयी झाले. उमाळी ग्राम पंचायत वाॅर्ड क्रमांक एक मधुन किशोर अजाबराव धोरण, डॉ. कोमल राजेंद्र राऊत, पुष्पा संजय राऊत, वॉर्ड क्रमांक दोन मधुन बाबूसिंग गुलाबसिंग चव्हाण, भीमाबाई रामदास गवई, सरला सोपान बोपले व वाॅर्ड क्रमांक तीन मधून शे. गुलाम हुसेन शे. रज्जाक, संघमित्रा अनिल इंगळे व वाॅर्ड क्रमांक चार मधून प्रमिता राजू निंबोळकर, विवेक ज्ञानदेव शिंगाडे, कविता धनराज धोरण, असे एकूण ११ उमेदवार विजयी झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...