आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक दिन उत्साहात:धाड येथील ज्ञानदेवराव दांडगे ज्ञान मंदिरात विद्यार्थ्यांनी साकारल्या शिक्षकांच्या भूमिका

चिखलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

धाड येथील ज्ञानदेवराव बापू दांडगे ज्ञानमंदिरात शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान विद्यार्थ्यांनी दिवसभर शिक्षकांची भूमिका साकारत वर्गावर अध्यापनाचे कार्य केले. या कार्यक्रमाचे नियोजन विद्यार्थ्यांनी केले होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपरोक्त महापुरुषांच्या प्रतिमेला उपप्राचार्य जाधव यांच्यासह सर्व शिक्षक व एक दिवसासाठी शिक्षकांची भूमिका साकारणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर नियमितपणे विद्यार्थ्यांनी तासिका सुरू ठेवल्या.

मुख्याध्यपिका म्हणून इयत्ता १२ वीची विद्यार्थिनी श्रद्धा पंढरीनाथ जाधव हिने काम पाहिले. शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी भाषण करून प्रेक्षकांची मने जिंकली. या वेळी शाळेचे उपप्राचार्य जाधव यांनी विद्यार्थ्यांना शिक्षक दिनाचे महत्व सांगितले. याबरोबरच शिक्षकांनीही मनोगत व्यक्त करत मानवी जीवनात शिक्षकाचे महत्व स्पष्ट केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक नरोटे यांनी केले. सूत्रसंचालन शिक्षिका आखरे यांनी केले, तर आभार अश्विनी नरवाडेने मानले.कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

बातम्या आणखी आहेत...