आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रावण महिना:बेल पुडा विक्रीतून होतेय अनेकांच्या रोजगाराची सोय ; दर सोमवारी वाहिले जाते पिंडीवर

बुलडाणा8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रावण महिना आल्यानंतर खरंतर विविध सणासुदींना सुरुवात होते. धार्मिक महोत्सव मोठ्या प्रमाणात सुरु होतात. श्रावणातील प्रत्येक सोमवार तर महादेवाची पुजा करण्याचे असतात. महिला घरी किंवा मंदिरात महादेवाच्या पिंडीला बेलाची पाने वाहतात. हा बेल पुडा विक्रीतून काही जणांना रोजीरोटी सुद्धा मिळते. या बेलाचे महत्व पौराणिक कथांमध्येही सांगितले आहे. आजही त्याचे महत्व आहे.या बेल पत्राबाबत दिवाकर नायडू यांनी सांगितले की, स्कंद पुराणाप्रमाणे एकदा माता पार्वतीला फार मोठा घाम फुटला.

त्या घामाचे काही थेंब मंदाचर पर्वतावर पडले. त्याचे बिजात रुपांतर झाले, त्यापासून एक बेल वृक्ष उत्पन्न झाले. त्या वृक्षांमध्ये माता पार्वतीचे सर्व रूप असल्याने भगवान शिवजीला बेलाची पाने प्रिय आहेत. कारण या वृक्षामध्ये गिरिजा, माहेश्वरी, काथ्यानी व लक्ष्मीचा वास असतो. ह्या पानामध्ये पार्वती प्रती बिंदू असते, असे त्यांनी सांगितले. तर बेल पान महादेवाच्या पिंडीवर वाहिले तर भगवान शिव त्याच्यावर प्रसन्न होतात, त्याची मनोकामना पूर्ण करतात, या वृक्षाजवळ साप सुद्धा फिरकत नाही. एखादे प्रेत यात्रा, या झाडा सावलीतून गेलेत, तर त्या प्रेतास मोक्ष मिळतो.चार किंवा पाच पानांचे बेल शिवपिंडी वर चढवले तर त्याला अनंत गुणाचे फळ प्राप्त होते. सकाळ संध्याकाळ या वृक्षाचे दर्शन घेतल्यास आपले पाप दोष नाश होतात. या वृक्षाला रोज पाणी व त्याची व्यवस्थित जोपासना केल्यास आपले पितर तृप्त होतात. पूर्वी ऋषीमुनी या बेलाच्या पानापासून एक विशेष प्रयोग करून तांब्याचे सोने करत होते. बेलाचे झाड कोणीही तोडू नये तसे केल्यास आपल्या वंशाचा नाश होती. बेलाच्या झाडाची मुळापासून पूजा व त्याला पाणी देऊन त्याला त्याच्या सेवेनुसार नुसार भगवान महादेवाचा साक्षात्कार होण्याची संभावना असते. बेलाचे झाड लावल्याने त्याच्या वंशाची वाढ व सुख समृद्धी प्राप्त होते, अशी माहिती आपण विविध पौराणिक कथा, साहित्यातून संकलित केल्याचेही दिवाकर नायडू यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...